Amol Mitkari|
Amol Mitkari|  
विदर्भ

Amol Mitkari|मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलाय आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा धसका

सरकारनामा ब्युरो

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी जर २५० रुपये मजुरीने लोक जमवावे लागत असतील तर शिंदे गटाच्या आमदारांचे भविष्य धोकादायक आहे. असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. सरकारनामाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करत आहेत त्यांचे संघटना बांधणीचे काम जोरात सुरु आहे. असे विचारले असता मिटकरी म्हणाले की, शिंदे गटात अस्वस्थता आहे. कारण दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आणि चेहरा हटवला तर शिंदे गटाला फारसे अस्तित्व नाही. पण आदित्य ठाकरेंच्या पाठीशी बाळासाहेबांची, वाडवडिलांची पुण्याई आहे म्हणून ते राज्यभर फिरतायेत. आतापर्यंत त्यांनी कोकण, जळगावचा दौऱा केला तिथेही त्यांना लाखो लोकांचा प्रतिसाद होता. त्याचाच धसका कदाचित त्यांनी घेतला असावा, नाहीतर उगीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा इथे लालबागच्या दर्शनाच्या निमित्ताने आले नसते. उगीच त्यांनी महापालिका निवडणूकांसाठी बैठका घेतल्या नाहीत.

पण एक गोष्ट नक्की आहे. शिवसेनेचे आमदार जरी शिंदे गटात गेले असले तरी आमदारांसोबत सामान्य शिवसैनिक गेला नाही. शिवसेनेची वोटबॅंक आहे ती अजूनही कायम आहे आणि तीच वोट बॅंक शिंदे सरकारसाठी धोक्याची ठरु शकते, असही मिटकरींना म्हटंल आहे.

भाजपने शिवसेना संपवली असा आरोप केला जातोय, आता शिंदे गटाचे सर्व आमदार भाजपसोबत गेले, आता यांचे काय भवितव्य असेल, या प्रश्नावर बोलताना मिटकरी म्हणाले की, १९९२ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला महाराष्ट्रात आश्रय दिला. शिवसेना पहिल्यापासून मोठा भाऊ होता, शिवसेनेच्या जीवाववर भाजप खेड्यापाड्यांपर्यंत पोहचला. पण आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ कमी झाले. पण शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग आजही महाराष्ट्रात आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकामंध्ये त्यांनी कितीही ताकद लावली, कितीही पैसा खर्च केला तरी पुढच्या निवडणूका त्यांना जिंकता येऊ शकत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT