Sanjay aut and Chitra Wagh Sarkarnama
विदर्भ

Chitra Wagh : संजय राऊतांनी ‘या’ विषयात ज्ञान पाजळू नये...

Sheetal Mhatre : आमदार घोषाळकर यांनी शीतल म्हात्रे यांना कशा प्रकारे त्रास दिला होता.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Chitra Wagh Vs Sanjay Raut News : सर्वज्ञानी असलेले संजय राऊत यांची महिलांबाबतची भूमिका, मानसिकता महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांनी या विषयावर भाष्य करू नये. त्यांचे खायचे दात वेगळे आहे, दाखवायचे वेगळे आहेत, अशा घणाघात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला.

राजकारणात काम करणाऱ्या महिला फार नाहीत. त्यांना पुढे आणणे, हे माझं काम आहे. आमदार घोषाळकर यांनी शीतल म्हात्रे यांना कशा प्रकारे त्रास दिला होता, हे सर्वांनी पाहिलेले आहेत. तेव्हाही हे कुणीच आले नाही. तिचे नंबर टॅायलेट मध्ये लिहून ठेवले होते. ती असं करू शकत नाही. महिला म्हणून मी तिच्यासोबत आहे. संजय राऊत यांनी या विषयात त्यांचे ज्ञान पाझळू नये. घडलेल्या प्रकाराची चौकशी व्हावी, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

आधीच फार कमी महिला राजकारणात आहेत. महिलांना त्रास का दिला जात आहे. मी शीतल सोबत आहे. जे काही कुणी केलं त्याला पायबंद घालणं गरजेचं आहे. सामाजिक माध्यमात कमरेखालची भाषा वापरून आमच्यावर टीका करतात. हे थांबायला हवं. शीतल म्हात्रेंचा राजकारणातील प्रवास थांबावा, म्हणून असा प्रयत्न करतात. पण आम्ही अशांना भीक घालत नाही.

महिला म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हा विषय एकट्या शीतलचा नाही. इतर आणि राजकारणात (Politics) वावरणाऱ्या तमाम महिलांचा आहे. आज शितलसोबत झालं, उद्या आमच्यासोबतही होईल. राजकारण चांगलं क्षेत्र आहे. पण महिलांना अशाप्रकारे टार्गेट केलं तर नवीन महिला राजकारणात येणार नाहीत. महाविकास आघाडीत फ्रस्ट्रेशन आहे. अधिवेशनात त्यांचे काही चालत नाहीये. त्यामुळे ते अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहेत.

सध्या सुरू असलेल्या मंडळाच्या बैठका संघटनेच्या बांधणीसाठी आहेत. महिला मोर्चा मजबूत करण्याचा प्रयत्न आहे, त्यासाठी विदर्भ दौरा सुरू आहे. ८ ते १५ मार्च यादरम्यान महिलांना स्व. सुषमा स्वराज (Sushama Swaraj) पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे, हे सांगतानाच गेल्या अडीच वर्षांत आंदोलन झाले नाही. पण आता मोर्चे निघत आहेत. त्यांना नाय मिळेल. हे मोर्चे पाठवलेले आहेत. मोर्चे स्वतःहून आलेले असोत किंवा पाठवलेले असोत, पाठवलेल्या मोर्चांनासुद्धा या सरकारमध्ये (Government) न्याय मिळे, असे चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT