Vikas Thakre
Vikas Thakre Sarkarnama
विदर्भ

Congress कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट; आमदार ठाकरे म्हणाले, आंदोलन तीव्र करणार...

सरकारनामा ब्यूरो

Congress Agitation at Collector Office : नागपूरच्या अंबाझरी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन शासनाने तोडले. या विरोधात आज नागपुरात काँग्रेसने आंदोलन केले. अंबाझरी उद्यानात बांधकामाच्या नावावर हे स्मारक पाडण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचा आहे. शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये (Police) चांगलीच झटापट झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector Office) कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी महिला कॉंग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांचीही लक्षणीय उपस्थिती होती. घोषणाबाजी सुरू झाली आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा पोलिसांना त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाली.

यासंदर्भात अनेकदा निवेदन, आंदोलन करण्यात आले, मात्र यावर कारवाई झाली नाही, त्यामुळं आज आंदोलन करत असल्याचं विकास ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडविले. दरम्यान कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. यावेळी तेथे चांगलाच गोंधळ उडाला होता. आज दुपारी १२ वाजता नागपूर शहर (जिल्हा )काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.

अंबाझरी उद्यानातील आंबेडकर भवन तोडणाऱ्यांवर कारवाई करून नव्याने आंबेडकर भवन बांधणे, बिरसा मुंडा भवन नियोजित जागी बनविणे, पेट्रोल डिझेल दरवाढ, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना प्रचंड घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. यावेळी प्रदेश पदाधिकारी, शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी, सर्व फ्रंटल व सेल अध्यक्ष व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अंबाझरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. सरकारने ही ४४ एकर जागा खासगी व्यक्तीला दिली. त्यानंतर त्याने आंबेडकर भवन तोडले. यामुळे नागपूरकरांचा स्वाभिमानाला ठेच लागली आहे. विनापरवानगी हे भवन तोडल्यामुळे त्या व्यक्तीवर कारवाई करावी, गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आम्ही केली आहे. पण त्याकडे सरकार लक्ष देत नाहीये. यापूर्वीही आम्ही मागणी केली असता, १५ दिवसांत कारवाई करण्याचे आश्‍वासन मिळाले होते. पण कारवाई झाली नाही, असे आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले. यापुढे आंदोलन अधिक तीव्र करू, असेही आमदार ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT