CM Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis : शहरी नक्षलवादावरुन फडणवीसांचा थेट विरोधकांवर गंभीर आरोप; म्हणाले, 'विद्यार्थ्यांचे कॅम्पस देशात...'

Devendra Fadnavis on Urban Naxalism : देशातील माओवाद, नक्षलवाद संपुष्टात येत आहे. मात्र, दुसरीकडे देशातील वातावरण प्रदूषित करण्याचे प्रयत्न केले जात आहे. याकरिता विद्यार्थ्यांचा वापर केला जात आहे.

Deepak Kulkarni

Nagpur News : बंदुकधारी नक्षलवाद्यांना नियंत्रण आणण्यास केंद्र व राज्य सरकारला मोठे यश आले आहे. मात्र, आता शहरी नलक्षवाद्यांची नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. हा नक्षलवाद विरोधकांमार्फत पसरवला जात असून विद्यार्थ्यांचे कॅम्पस देशात अराजकता पसरवण्याचे मोठे अड्डे झाले असल्याचा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

केंद्रात आणि राज्यात आपल्या भाजप (BJP) विचारांची सत्ता असल्याने विरोधक सैरभर झाले आहेत. त्यामुळे देशाचे संविधान आणि सार्वभौमत्वावर धोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याकरिता विद्यार्थ्यांना टार्गेट केले जात आहे.

शहरी नक्षलवाद कॅम्पसमधून पसरवल्या जात आहे. याला थोपवण्यासाठी आता देशभक्त विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विदर्भ प्रांत अधिवेशनाचे उद्‍घाटन आज रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

देशातील माओवाद, नक्षलवाद संपुष्टात येत आहे. मात्र, दुसरीकडे देशातील वातावरण प्रदूषित करण्याचे प्रयत्न केले जात आहे. याकरिता विद्यार्थ्यांचा वापर केला जात आहे. त्यांच्या माध्यमातून संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवर अविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहे.

न्यायालये, संसद, विधानसभा या संस्थांवरचा विश्वास उडेल यासाठी काही शक्ती काम करत आहेत. राष्ट्रवादी ताकदीने या विरोधात आता उभे राहण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 मध्ये विकसित भारत करण्याचा संकल्प केला आहे. यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

त्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा लढा उभारावा लागणार आहे. एकेकाळी काश्मीरच्या लाल चौकात भारताचा तिरंगा फडकावण्याची मुभा नव्हती. देशातील सरकारही यास परवानगी देत नव्हती. ते काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने करून दाखवले, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.

विद्यार्थी परिषदेच्यावतीने महाविद्यालयीन निवडणुका सुरू करण्याची विनंती फडणवीस यांना करण्यात आली होती. याचा आमचे सरकार गांभीर्याने विचार करेल,असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT