Santosh Bangar Viral Video
Santosh Bangar Viral Video sarkarnama
विदर्भ

Santosh Bangar News : शिंदे गटातील आमदाराचा 'नवा पराक्रम' ; Video व्हायरल ; प्राध्यापिकेला..

सरकारनामा ब्युरो

Hingoli News : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे (mla santosh bangar) आपल्या आक्रमकतेमुळे नेहमीच चर्चेत असतात. यामुळे मागील काही दिवसापासून संतोष बांगर हे वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत.

संतोष बांगर यांनी यापूर्वी अधिकारी, पदाधिकारी यांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत, आता त्यांनी एका प्राचार्यांना मारहाण केल्याच्या व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

डॉ. अशोक उपाध्याय असं या प्राचार्यांचं नाव आहे. बांगर यांनी सर्वांसमोर या प्राचार्यांचे कान पकडले आणि त्यांना मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हिंगोलीच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे.

हे प्राचार्य एका प्राध्यापिकेला त्रास देत असल्याची तक्रार बांगर यांच्याकडे आली होती. याचा जाब विचारण्यासाठी बांगर हे डॉ. उपाध्यक्ष यांच्याकडे आले होते. हा मारहाणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. बांगर यांनी केलेल्या या कारनाम्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

संतोष बांगर यांनी यापूर्वी केलेले 'कारनामे'

  • मध्यान्ह भोजनामध्ये दिल्या जाणाऱ्या वरणात अळ्या सापडल्या होत्या तेव्हा त्यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती.

  • ऑक्टोबरमध्ये कृषी विभागाच्या कार्यालयात राडा घातला होता. त्यांनी शेतकऱ्यांसह पिकविमा कार्यालयाची तोडफोड केली होती.

  • बांगर यांनी वीज विभागाच्या कर्मचाऱ्याला फोनवरुन मारण्याची धमकीही दिली होती.

  • मंत्रालयात प्रवेश करताना संतोष बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप झाला होता.

  • मंत्रालयाच्या गार्डन गेटमधून कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावरुन त्यांनी गोंधळ घातल्याची चर्चा होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT