Nandurbar News, 14 Jun : कॉक्रोच जनता पार्टी सध्या सगळीकडे चर्चेत आहे. दिल्ली येथे झालेल्या आंदोलनानंतर युवकांमध्ये या पक्षाचे विशेष चर्चा आहे. मात्र या पार्टी संदर्भात सुजात आंबेडकर यांनी सावधानतेचा इशारा दिला.
वंचित बहुजन आघाडीचा मेळावा शनिवारी नंदुरबार येथे झाला. पक्षाचे युवा नेते सुजाता आंबेडकर यांनी यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. या मेळाव्याला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सुजात आंबेडकर यांनी कॉक्रोच जनता पार्टी आणि त्या पक्षाचे नेते अभिजीत दिपके यांच्या विषयी गंभीर विधान केले.
दिपके यांच्या विषयी आंबेडकरी युवकांनी सावध राहावे असा इशारा त्यांनी दिला. सुजात आंबेडकर म्हणाले, 'सध्या कॉक्रोच जनता पार्टीची चर्चा सगळीकडे आहे. काही युवकांना त्याच्या आकर्षण देखील आहे. यामध्ये आंबेडकरी विचाराचे युवकही आहेत.
या पक्षाचे नेते अभिजीत दिपके नुकतेच दिल्ली विमानतळावर आले. यावेळी त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता. त्याचबरोबर "डॉ बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोग्राफी"हे पुस्तक देखील दिसून आले. त्यामुळेच चिंता करावी अशी स्थिती वाटली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणतीही बायोग्राफी अर्थात आत्मचरित्र लिहिलेले नाही. स्वतःचे काही अनुभव कथन केलेले "वेटिंग फॉर व्हिसा" हे एकमेव पुस्तक आहे. मग दिपके यांच्या हातात डॉ बाबासाहेब आंबेडकर ऑटोबायोग्रफी हे आत्मचरित्र आले कुठून? हे पुस्तक ते न्यूयॉर्क येथून घेऊन आले होते, हे विशेष.
त्याचा बारीक अभ्यास केला तेव्हा अभिजीत दिपके यांच्याकडे असलेले पुस्तक डायमंड पब्लिकेशन या संस्थेने प्रकाशित केलेले आहे. हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक समरसता या संस्थेकडून पुढे आलेले दिसते. संघाची ही संस्था महामानवांचे चरित्र सोयीने बदल करून प्रकाशित करते असा आजवरचा अनुभव आहे.
अभिजीत दिपके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो किंवा चरित्र बाळगण्यास कोणाचीही हरकत नाही. मात्र ते जे पुस्तक घेऊन फिरत आहेत ती एक धोक्याची घंटा आहे. आंबेडकरी युवकांनी अभ्यासू असले पाहिजे. अन्यथा त्यांना कोणीही फसवून जाईल. आंबेडकरी युवकांनी त्यामुळेच सावध व्हावे.
अभिजीत दिपके यांच्याकडे आंबेडकरी युवक निळा झेंडा म्हणून आकर्षित होतील. आणि प्रत्यक्षात मात्र तो निळा झेंडा धोक्याचा लाल झेंडा असावा. अशी सध्याची स्थिती वाटते आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेने कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत इतके यांच्याबाबत सावध झालेले बरे, असा इशारा सुजात आंबेडकर यांनी युवकांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.