yashomati Thakur chandrakant patil  sarkarnama
विदर्भ

Video Yashomati Thakur : अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात राडा, चंद्रकांतदादांसमोरच यशोमती ठाकूर भडकल्या; नेमकं काय घडलं?

Akshay Sabale

Amaravati News : अमरावतीत खासदाराच्या कार्यालयावरून मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदाराच्या शासकीय कार्यालयाचा ताबा मिळण्यावरून काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे आक्रमक झाल्या.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच यशोमती ठाकूर संतप्त झाल्या. त्यामुळे जिल्ह्याधिकारी कार्यालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तर, चंद्रकांत पाटील यांच्याकडून यशोमती ठाकूर यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आमदार ठाकूर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.

नेमकं प्रकरण काय?

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात खासदारांसाठी शासकीय कार्यालय आहे. हे कार्यालयात पूर्वी नवनीत राणा यांना देण्यात आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर कार्यालयाचा ताबा देण्याची मागणी यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. पण, ताबा न मिळाल्यानं यशोमती ठाकूर, खासदार वानखेडे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आले.

यावेळी कार्यालयाचा ताबा न दिल्यानं यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या. आम्हाला कार्यालयाचा ताबा द्या अन्यथा कुलूप तोडू, असा इशाराच यशोमती ठाकूर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोर दिला. "तुम्हाला गुन्हे दाखल करायचे करा. याच्यापुढे भाजप सरकार काय करू शकते?" असा तिखट सवालही ठाकूर यांनी चंद्रकांत पाटलांना विचारला.

त्यासह राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांना दुसरे कार्यालय द्यावे. एकाच कार्यालयात दोन भाग कशाला करता, असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं. यानंतर यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे यांनी जात खासदार कार्यालयाचं कुलूप तोडून ताबा घेतला.

मागासवर्गीय खासदार असल्यानं प्रशासन जातीयवाद करत आहे, असा आरोपी यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT