Sunil Kedar and Vijay Wadettiwar
Sunil Kedar and Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Congress Leaders News : काँग्रेसच्या निवडणूक समन्वय समितीत नाहीत केदार आणि वडेट्टीवार !

सरकारनामा ब्यूरो

Sunil Kedar and Vijay Wadettiwar News : नागपूर जिल्हा परिषद, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत कॉंग्रेसला दणदणीत विजय मिळवून देणारे कॉंग्रेस नेते, माजी मंत्री आमदार सुनील केदार यांना काँग्रेसच्या निवडणूक समन्वय समितीतून वगळण्यात आले आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. (Surprise is being expressed due to this decision of the party)

विशेष म्हणजे कधी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूकसुद्धा लढले नसलेल्यांना या समितीत स्थान देण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सुनील केदार यांच्यातील शीतयुद्धामुळे हे घडले का, असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे. येत्या रविवारी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा नागपुरात होत आहे. या सभेच्या नियोजनाची आणि यशस्वी करण्याची जबाबदारीही केदारांवर सोपवण्यात आली आहे. तरीही त्यांना का वगळण्यात आले, हे कळायला मार्ग नाही.

प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणूक समन्वय समितीची स्थापना केली आहे. १७ सदस्यांच्या या समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. सदस्यांमध्ये विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष अमरजित मनहास, प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार व प्रमोद मोरे यांचा समावेश आहे.

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मंत्रिमंडळात असलेल्या बहुतांश नेत्यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. मात्र केदार आणि माजी मंत्री विजय वडेट्‍टीवार हे अपवाद आहेत. महाविकास आघाडीच्या नागपूर येथे होणाऱ्या वज्रमूठ सभेची जबाबदारी केदार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. काँग्रेससाठी अतिशय अवघड असलेली नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक केदारांच्याच नेतृत्वात काँग्रेसने जिंकली.

या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले होते. ही जागा भाजपच्या (BJP) हातून त्यांनी हिसकावून घेतली. अलीकडेच झालेल्या शिक्षक संघाच्या निवडणुकीतही केदार यांनी विजयाच्या शिल्पकाराची भूमिका बजावली होती. ही जागाही बारा वर्षानंतर त्यांनी काँग्रेसला परत मिळवून दिली. विद्यमान शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांची उमेदवारी केदार (Sunil Kedar) यांनीच जाहीर केली होती.

शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवाराला येथून माघार घेण्यास त्यांनी भाग पाडले होते. विशेष म्हणजे या समिती काही सदस्य विधानसभेची सोडा स्थानिक स्वराज्य संस्थेचीसुद्धा निवडणूक एकदाही लढलेले नाहीत. असे असताना केदारांना समितीत स्थान दिले नसल्याने अनेकांना खटकत आहे.

(Edited By - Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT