Anil Bonde News  Sarkarnama
विदर्भ

Yashomati Thakur News : आडनावावरून राजकारण पेटलं; ठाकूर बोंडेंना फटकारत म्हणाल्या, "बोंडेंच्या बोंडअळ्या..."

Maharashtra Politics : "आडनावावरून जर राजकारण होणार असेल, तर बोंडेंच्या बोंडअळ्या कशा आल्या हे विचारायचं का?"

Mangesh Mahale

Amravati : भाजपचे राज्यसभेतील खासदार अनिल बोंडे आणि काँग्रेसच्या आमदार, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे. आडनावावरून विदर्भातील राजकारण पेटलं आहे. ठाकूर आडनावावरून बोंडेंनी यशोमती ठाकूर यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. त्याला यशोमती ठाकूर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

"अनिल बोंडे यांना नैराश्य आले आहे. त्यांना इतिहास कळत नाही. मी महिला आमदार आहे, महिलांचा मान सन्मान करायचा असतो, हे त्यांना माहीत आहे की नाही? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. "ठाकूर घराणं मोठं घराणं आहे. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ठाकूर घराणे लढले आहे. त्यांची इतिहासामध्ये नोंद आहे. तो इतिहास तुमच्या घराण्याला नाही, त्याला मी काय करू?, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. (Latest Marathi News)

"आडनावावरून जर राजकारण होणार असेल, तर बोंडेंच्या बोंडअळ्या कशा आल्या हे विचारायचं का?" असा संतप्त सवाल ठाकूर यांनी केला आहे. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, जनसामान्यांची कामं झाली पाहिजेत, संत्र्यांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे भाव घटले आहेत, यावर कोणी बोलत नाही, अशी खंत ठाकूर यांनी व्यक्त केली.

भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने राज्यात ओबीसी जागर यात्रा सुरू करण्यात आली आहे. काल (सोमवारी) ही यात्रा अमरावती येथे आली होती. यानिमित्ताने अमरावती शहर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले होते. यशोमती ठाकूर यांनी या यात्रेवरून भाजपला टोला लगावला होता. "इलेक्शन आले की भाजपला असे धंदे सुचतात," अशा शब्दांत ठाकूर यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. त्याला अनिल बोंडेंनी प्रत्युत्तर दिले होते.

काय म्हणाले होते अनिल बोंडे

"इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूरांना 'ठाकूर' पदवी मिळाली. ठाकूरांमध्ये इंग्रजांचा 'डीएनए'," असे वादग्रस्त विधान अनिल बोंडे यांनी केले. भाजपची ओबीसी यात्रा अमरावती जिल्ह्यातील यशोमती ठाकूर यांचा मतदारसंघ असलेल्या तिवसा येथे आली होती. त्यावेळी कार्यक्रमात अनिल बोंडे यांनी हे विधान केले. "काँग्रेसचा डीएनए महात्मा गांधीचा नाही, तर तो फिरोज जहांगीर गांधींचा आहे," असेही बोंडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT