Yashomati Thakur at Samvidhan Rally at Amravati. Sarkarnama
विदर्भ

Amravati Yashomati Thakur : भारतीय संविधान हाती घेत केली भाजपवर टीका

Samvidhan Din : आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या, भाजपसाठी हिंसाचार नवीन नाही

Amar Ghatare

Respect For Constitution by Congress : भाजपसाठी हिंसाचार घडविणे ही बाब काही नवीन नाही. तो त्यांचा अजेंडाच आहे. फोडा आणि राज्य करा अशी त्यांची वृत्ती आधीपासूनच आहे. अशात भारतीय संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांवर आहे. ती काळाची गरज आहे, असं मत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं.

अमरावती येथे रविवारी (ता. 26) संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ काँग्रेसनं संविधान दिनामित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. (Congress MLA Yashomati Thakur From Amravati Criticised BJP For Spreading Violence In Country)

काँग्रेसच्या संविधान जागृती रॅलीला अॅड. ठाकूर यांच्यासह माजी आमदार डॉ. सुनील देशमुख, विलास इंगोले, बबलू शेखावत आदी उपस्थित होते. संविधान दिनानिमित्त शहरातून यावेळी सन्मान जागृती पदयात्रा रॅली काढण्यात आली. आमदार अॅड. ठाकूर यांनी रॅलीचं नेतृत्व केलं. डॉ. पंजाबराव देशमुख व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेत होते. डॉ. पंजाबराव देशमुख यांची मूळ कर्मभूमी अमरावती आहे. त्यामुळे त्यांच्या शहरात ही रॅली निघणं चांगला संकेत आहे, असं अॅड. ठाकूर म्हणाल्या.

देशात अरेरावी चालली आहे. त्यामुळं संविधान जागृतीची गरज आहे. सत्ताधारी संविधानाची पायमल्ली करीत आहेत. त्यामुळं संविधान आणि त्यातील तरतुदी जपल्या जाणं नितांत गरजेचं आहे. सध्या केंद्रात आणि राज्यात जे लोक सत्तेत आहेत, त्यांना सातत्याने हिंसाचार घडवायचा असतो हे सर्वश्रूत आहे. एका समाजाला दुसऱ्या समाजाविरुद्ध भडकाविण्याचं काम ते करीत आहेत. त्यामुळं लोकांना सत्ताकारणापेक्षा संविधान समजावणं अधिक गरजेचं झालय, असं अॅड. यशोमती ठाकूर यांनी नमूद केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी डिसेंबरच्या अखेरीस राज्यात हिंसाचार होईल, असं म्हटलं आहे. भाजपची नेहमीची कार्यशैली पाहता ते सत्तेसाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकतात. त्यात नवीन काहीच नाही, अशी टीकाही अॅड. ठाकूर यांनी केली. सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा समाजवाद निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यात चाललेला आहे. मराठा समाज आणि ओबीसी यांच्याबाबत सरकारनं स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देणार असं सरकार सांगत आहे. हे आरक्षण कसं देणार आहे, याबाबत अद्यापही सरकार स्पष्टपणे सांगत नाहीये. सरकारकडून स्पष्टपणे सांगणं शक्य दिसत नाही, असं त्या म्हणाल्या.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT