Prakash Ambedkar, Rahul Gandhi & Nana Patole. Google
विदर्भ

Nagpur Nana Patole : ‘वंचित’च्या सभेला राहुल गांधी नव्हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जाणार

Atul Mehere

Vanchit Bahujan Aaghadi : मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या संविधान सन्मान महासभेला काँग्रेस नेते राहुल गांधी येणार नाहीत, यावर आता शिक्कामोर्तब झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी ही माहिती दिली.

नागपूर येथे शनिवारी (ता. 25) आमदार पटोले म्हणाले, राहुल गांधी तेलंगणा येथील निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळं त्यांचा प्रतिनिधी या नात्यानं त्यांनी आपल्याला या सभेला उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. (Congress State President Nana Patole Clarifies Rahul Gandhi Will Not Attend Samvidhan Sanman Mahasabha Of Prakash Ambedkar's Vanchit Bahujan Aaghade At Mumbai Due to Busy scheduled of Telangana Assembly Election)

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींना निमंत्रण दिले होते. परंतु राहुल गांधी हे तेलंगणातील प्रचारात व्यस्त आहेत. आपल्या देशाचं संविधान धोक्यात आहे. भाजपनं संविधान संपविण्याचं काम सुरू केलं आहे. जी मंडळी संविधानाला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असतील, त्यांच्याबरोबर काँग्रेस राहणार आहे. त्यामुळं राहुल गांधी यांनी आपल्याला या सभेला आवर्जून जाण्यास सांगितलंय, असं पटोले म्हणाले.

राज्यामध्ये वातावरण दूषित करण्याचं काम भाजप करीत आहे. मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं. त्यांच्या गावात लाठीमारचे आदेश राज्याचे गृहमंत्र्यांनी दिलेत असे ते स्वतः म्हणतात. लाठीमार कशासाठी केला गेला होता. याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही. पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई झाली. त्यानंतर हा वाद पेटला. राज्याचे मंत्री समाजांमध्ये भांडण लावण्याचं काम करत असतील तर हा तणाव सरकारनंच निर्माण केलाय, असं म्हणावं लागेल असं पटोले म्हणाले. मराठा आंदोलनात अनेक तरुणांनी आरक्षणसाठी आत्महत्या केल्या आहेत. मराठा विरुद्ध ओबीसी परिस्थिती निर्माण केली जात आहे, असंही ते म्हणाले. भाजपला देश आरक्षणमुक्त करायचा आहे. ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही भूमिका आहे. आरक्षण मागासवर्गाला भेटायला हवं ही काँग्रेसची भूमिका आहे, असं पटोले यांनी नमूद केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी 2014 मध्ये निवडणुकीच्या वेळी देशात आणि राज्यात सत्ता द्या आम्ही आरक्षण देतो, असे जाहीर केले होते. आता त्यांनी आरक्षण कसं द्यायचं ते ठरवावं. हा सरकारनं निर्माण केलेला तिढा आहे. त्यामुळं काय निर्णय घ्यायचा तो सरकारचा प्रश्न आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकांच्या तोंडाला आरक्षणाच्या नावाखाली पानं पुसण्याचा प्रकार सरकारनं करू नये, असं आवाहन पटोले यांनी केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत पटोले म्हणाले, डेंगी झाला असताना दिल्लीमध्ये जावं लागतंय यावरून हे स्पष्ट होतंय की राज्यात जेव्हा अस्थिरता होती. राज्यात दोन समाजात वाद सुरू होते. अशावेळी सारे नेते महाराष्ट्रात होते. परंतु दादा दिल्लीत होते. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर आहात. त्यामुळं लोकांना तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. त्यामुळं अजित पवारांना कुणी दिल्लीला का गेले होते, असा प्रश्न वारंवार विचारला तर त्यात संताप येण्यासारखं काहीही नाही, असं आमदार नाना पटोले म्हणाले.

Edited by : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT