Chandrapur Mayor News : काँग्रेसमधील दोन मोठ्या नेत्यांच्या भांडणामुळे सर्वाधिक जागा मिळूनही चंद्रपूरची महापालिका हातातून हातातून जाणार अशी चर्चा होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात मध्यस्थी करत यांच्यातील भांडण मिटवले आहे.त्यामुळे काँग्रेसच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
चंद्रपूर महापालिकेत बहुमतासाठी 32 जागांची आवश्यकता आहे. तर, काँग्रेसकडे सर्वाधिक 27 जागा आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि अपक्षांसोबत घेत काँग्रेस सत्ता स्थापन करण्याची शक्यता होती. मात्र, वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने येथील चित्र बदललेल होते.
आज सकाळी हर्षवर्धन सपकाळ यांनी झुम मिटींग घेत धानोरकर आणि वडेट्टीवार यांनी माघार घेतली आहे. सत्ता स्थापनेची जबाबदारी धानोरकर यांनी घेतली आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांनी आमच्या दोघांमधील वादावर तात्पुरता पडदा पडल्याचे सांगितले आहे.
प्रतिभा धानोरकर यांनी सत्ता स्थापनेची जबाबदारी घेतली आहे. ते ज्या नगरसेवकाचे नाव पुढे करतील तो नगरसेवक होणार आहे. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस गटाची एकत्रित दोन होईल, कुठेही दोन गटांची नोंद केली जाणार नाही, असे स्पष्ट केले.
विरोधी पक्षातील नगरसेवक फोडण्यासाठी भाजपने ऑपरेशन लोटस सुरु केल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, सत्ता त्यांच्याकडे आहे पैसा त्यांच्याकडे आहे. त्यातूनच ते मोठ मोठ्या ऑफर देत आहेत. माझ्या माहिती प्रमाणे एक कोटी रुपये आणि पदं देण्याचे देखील ऑफर देत आहेत. पद आणि पैसा यामुळे काय जादू होतंय आत्ता सांगणे कठीण आहे.त्याला कोणी बळी पडणार नाही. मात्र आज त्यावर बोलणे योग्य नाही. मात्र दुसऱ्याची मदत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.