Buldhana News: शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकर्याच्या अंत्यसंस्कारालाही कोणी जाऊ नये,असं विधान करत ते पुन्हा एकदा नव्या वादात अडकले आहेत. या त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर संतापाची लाट उसळली असतानाच त्यांच्या मतदारसंघातून एक मोठी धक्कादायक अपडेट समोर येत आहे.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या बुलढाण्यातील एक भीषण वास्तव समोर आलं आहे. 2015 ते 2026 या कालावधीत आमदार संजय गायकवाड यांचा मतदारसंघ असलेल्या बुलढाणा आणि मोताळा तालुक्यात तब्बल 288 शेतकर्यांनी विविध कारणांनी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.आमदार गायकवाड यांच्या मतदारसंघातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा समोर आल्यानं राजकारण तापण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रावर एकीकडे दुष्काळाचं संकट सावट असताना दुसरीकडे पावसानं मारलेली दडी, जळून गेलेली पिकं, कोसळलेले दर,डोक्यावरचं कर्जाचा बोजा यांसारख्या विविध कारणांना कंटाळून शेतकरी अखेर टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवताना दिसून येत आहे. यात मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक भागांत शेतकरी आत्महत्यांचं वाढलेली संख्या चिंताजनक आहे. यातच संजय गायकवाडांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणाऱ्या शेतकऱ्यांबाबत केलेलं वक्तव्य चीड आणणारं असल्यानं त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहे.
राज्याच्या राजकारणात शिवसेनेचे आक्रमक नेते संजय गायकवाड हे या ना त्यांच्या वादग्रस्त विधानं, मारहाण, शिवीगाळ,दमदाटी यांसारख्या अनेक घटनांनी नेहमीच चर्चेत असतात. मात्र,त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेलं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्काराबाबत वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या बुलढाणा आणि मोताळा या दोन तालुक्यांतील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न किती ऐरणीवर आला आहे.
सध्याच्या काळात राज्यासह संपूर्ण देशातील बळीराजा समोर वाढणारा शेती खर्च,नैसर्गिक संकटं, हवामानाची अनिश्चितता, पिकांचं नुकसान, आर्थिक कर्जाचा भार तसेच शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची कोणतीही नसलेली हमी या सर्व संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं. ज्यावेळी एखादा शेतकरी आयुष्यात आत्महत्येसारखं पाऊल उचलतो,त्यावेळी निश्चित त्यापाठीमागचं कारण देखील तपासणं तितकंच गरजेचं आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या विषयावर उद्गिग्न प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, शेतकरी हा कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आत्महत्या करतो. खरंतर शेतकऱ्याला काही अडचण असल्यास आमदार, खासदाराला चिठ्ठी लिहावी. त्यावेळी आम्ही मदत करू, असे संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांना सांगितले. खरंतर शेतकरी कुठलाही विचार न करता आत्महत्या करतात. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला देखील कुणी जाऊ नये, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.