Shambhuraj Desai Sarkarnama
विदर्भ

Cricketnama 2023 : शंभूराज देसाई चौकार, षटकारातून मुख्यमंत्री शिंदेंची ताकद वाढवणार...

Shambhuraj Desai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शिवसेना रायडर्स’ विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांची ‘एनसीपी लायन’ अशी लढत होणार

Umesh Bambare-Patil

Nagpur News : पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) : विदर्भाची राजधानी असलेल्या नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाने वातावरण गरम झाले आहे. सभागृहात एकमेकांवर शब्दांचे षटकार मारणारे आमदार 'क्रिकेटनामा'च्या सामन्यांच्या माध्यमातून चौकार, षटकार मारणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या टीमचे अव्वल दर्जाचे फलंदाज उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या टीमसोबत होणाऱ्या सामन्यातून चौकार, षटकारांची आतषबाजी करत मुख्यमंत्री शिंदेंची ताकद वाढवणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर महाराष्ट्रातील सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या 'सरकारनामा'च्या 'क्रिकेटनामा' या भव्य क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या शुभहस्ते सोमवारी दुपारी चार वाजता होणार आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आहेत. भाजपचे माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके हे निमंत्रक आहेत.

पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरीत मेकोसाबागेतील श्यालोम स्पोर्टस॒ ग्राऊंडवर ही स्पर्धा होत आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शिवसेना रायडर्स’ विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार ‘एनसीपी लायन’ अशी लढत होणार आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंकडून आमदारांची तगडी टीम तयार करण्यात आली आहे.

स्पर्धेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या टीमचे नेतृत्व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांची तगडी टीम तयार आहे. या टीममध्ये मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचे असलेले उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई हे या टीमची तगडे फलंदाज म्हणून ओळखले जातात. टीमची धावसंख्या वाढविण्यासाठी ते आक्रमकपणे मैदानात उतरणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीममधील आमदारांच्या गोलंदाजीवर चौफेर फटकेबाजी करत चौकार, षटकार लगावणार आहेत. या माध्यमातून ते शिंदेंच्या टीमची ताकद वाढवणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खेळाडू विजयासाठी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या खेळाडूंवर निशाणा साधणार आहेत. सगळ्याच टीमचे तगडे खेळाडू ‘सरकारनामा’ची ट्रॉफी पटकाविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT