Maharashtra Politics: छत्रपती संभाजी नगरमध्ये राजमार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे कंत्राटदार सक्षम नसल्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत, याकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार असल्याचे आश्वासन सरकारकडून (Government) देण्यात आले.
संभाजीनगर (Sambhaji Nagar) जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शरणापूर ते साजापूर- करोडीपर्यंत असलेल्या ६ किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या ८ वर्षांत तीन वेळा निधी उपलब्ध करूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्याच्या २८ कोटी रुपयांच्या कामासाठी ७ डिसेंबर २०२२ पर्यंत निविदा मागविण्यात आल्या. चार कंत्राटदारांकडून निविदा प्राप्त झाल्या तरी निविदा उघडण्यात आल्या नाहीत.
आतापर्यंत या रस्त्याच्या कामासाठी किती वेळा निधी उपलब्ध करून दिला? किती खर्च झाला व अखर्चित किती झाला ? तसेच संबंधित कंत्राटदाराने सक्षम नसल्याचे सांगत काम थांबवले. त्यामुळे त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार का असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
राजकीय (Political) वर्चस्वामुळे याला विलंब होत असल्याचा आरोप दानवे (Ambadas Danve) यांनी करत न उघडलेल्या निविदांवर चर्चा करण्यात यावी व चौकशी करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. तसेच संबंधित विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.