Darawha Bazar Samiti Result : Sanjay Rathod
Darawha Bazar Samiti Result : Sanjay Rathod  Sarkarnama
विदर्भ

Bazar Samiti Result : दारव्हा बाजार समितीत संजय राठोडांचा करिश्मा; 18 पैकी 16 जागांवर दणदणीत विजय!

सरकारनांमा ब्यूरो

Yawatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी मंत्री व आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने बाजी मारली आहे. राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिंदेच्या शिवसेनेने १८ पैकी १६ जागांवर विजय दणदणीत विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला केवळ दोन जागा मिळविता आल्या.

शिवसेनेचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासोबत सहकार क्षेत्रातील अनुभव असणारे नेते होते. १५ वर्षानंतर दारव्हा कृषी उत्पन्नसाठी निवडणूक होत होती. त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. संजय राठोड यांच्या पॅनेलसमोर महाविकास आघाडीचे पॅनल होते. मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. आघाडीचा सपशेल पराभव झाला.

पालकमंत्री संजय राठोड यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांना आपली सत्ता राखण्यात यश मिळाले. बाजार समिती निवडणुकीत नामनिर्देशन दाखल झाल्यानंतर पॅनल ठरवितांना जागा वाटपावरून महायुतीची चर्चा फिस्कटली. त्यामुळे भाजपच्या सर्व सहाही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडीत थेट लढत झाली.

प्रतिस्पर्धींनी प्रचारात चांगलीच ताकद लावली. गावागावात प्रचार, बैठका, मोठ्या सभा झाल्या. पालकमंत्री संजय राठोड, माणिकराव ठाकरे,संजय देशमुख, वसंत घुईखेडकर आदी मैदानात उतरले होते. मतदानाच्या दिवशीही पालकमंत्री राठोड, संजय देशमुख, वसंत घुईखेडकर, राहुल ठाकरे हजर झाले.

या निवडणुकीत ग्रामपंचायत गट ४९५ पैकी ४८७,स हकारी संस्था ४४८ पैकी ४४३, व्यापारी-अडते ८२ पैकी ८२ आणि हमाल-मापारी गट ८९ पैकी ८२ याप्रमाणे ९८ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ वाजता मतमोजणीला सुरवात होऊन तासाभरात निकाल लागला. निकालानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

विजयी उमेदवार :

1)सहकारी संस्था(सर्व सेना) -

सुशांत इंगोले,गोविंदराव जाधव,मारुती जावरे, प्रकाश दुर्गे,देवराव पवार,सुभाष पवार,शंकर भोंडे,सुभाष राठोड,विलास खेडकर,नानीबाई गावंडे,सुलोचना चव्हाण

2) ग्रामपंचायत गट - सर्व सेना -

आकाश ठोकळ,रामा राठोड,विजय तायडे, प्रकाश राठोड

3)व्यापारी-अडते (मविआ) -

सुभाष राठी,लक्ष्मीकांत ठाकरे

4)हमाल मापारी(सेना) -

प्रकाश उरकुडे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT