Pravin Darekar and Sanjay Raut
Pravin Darekar and Sanjay Raut Sarkarnama
विदर्भ

Pravin Darekar On Sanjay Raut: आपण सारेच चोर आहोत, म्हणत दरेकर झाले आक्रमक, म्हणाले राऊतांना अटक करा !

सरकारनामा ब्यूरो

Budget session News: 'ते विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे्', वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. त्यावरून विधान परिषदेत आज प्रवीण दरेकर चांगलेच आक्रमक झाले. आजच्या आज राऊतांना अटक करा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी सभागृहात आक्रमकपणे लावून धरली.

आधी राज्यपालांच्या अभिभाषणावर दरेकर यांचे भाषण झाले. त्यानंतर राम शिंदे यांचे भाषण सुरू झाले. थोड्याच वेळात प्रवीण दरेकर अचानक उभे झाले आणि संजय राऊतांचा विषय उचलून धरला. संजय राऊतांनी विधिमंडळाला चोर म्हणणे म्हणजे सर्व सदस्यांना त्यांनी चोर म्हटले आहे. विधिमंडळाचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे म्हणत ते आक्रमक झाले आणि आजच्या आज संजय राऊतांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

हा सत्ताधारी किंवा विरोधक, असा प्रश्‍न नाही. तर विधिमंडळाच्या प्रत्येक सदस्याच्या सन्मानाचा प्रश्‍न आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यानुसार, तुम्ही, आम्ही इतकेच काय तर उद्धव ठाकरेसुद्धा चोर आहेत. कारण ते सुद्धा सभागृहाचे सदस्य आहेत, असे म्हणत परबांनी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांना याप्रकरणी तातडीने लक्ष घालण्याचे आवाहन केले. या दरम्यान सभागृहात मोठा गदारोळ उडाला.

प्रवीण दरेकरांच्या मागणीनंतर राम शिंदे यांनीही तीच मागणी केली. ते म्हणाले, यासंदर्भात याआधीच हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तो प्रस्ताव तातडीने हक्कभंग समितीकडे पाठविण्यात यावा आणि हक्कभंगाची कारवाईसुद्धा तातडीने करण्यात यावी. यावेळी गदारोळ इतका वाढला की, सभापती निरंजन डावखरे यांनी सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब केले.

तत्पूर्वी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हेसुद्धा या विषयावर बोलले. विधिमंडळाला कुणा चोर म्हणत असेल, तर ते योग्य नाहीच. पण इतरही लोक विधिमंडळाबाबत आणि सदस्यांबाबत काय काय बोलतात, हे बघितले पाहिजे. या काळात सर्वांनीच शब्दांचा वापर जपून केला पाहिजे, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या (Sanjay Raut) बचावाचा अयशस्वी का होईना, पण प्रयत्न केला. पण प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आक्रमक झाल्यानंतर सभागृहाचे वातावरण एकदम बदलले आणि राऊतांच्या अटकेच्या मागणीने जोर धरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT