Datta Meghe News : ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी संपूर्ण विदर्भाला नुकताच मोठा धक्का दिला आहे. त्यांनी सावंगी येथील हॉस्पिटल अदानी फाऊंडेशनला सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. मेघे आणि अदानी फाऊंडेशन या दोन्ही संस्थांमध्ये तसा करारसुद्धा झाला आहे. दत्ताभाऊंचे हे हॉस्पिटल वर्धा आणि आजूबाजच्या जिल्ह्यातील गोरगरीब जनतेसाठी हक्काचा आधार होता. आजवर लाखो लोकांनी त्यांच्या हॉस्पिटलमधून मोफत उपचार घेतले आहेत.
हा निर्णय घेण्यामागे रुग्णांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश असल्याचे सागर मेघे आणि अदानी ग्रुप यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र अनेकांना अजूनही मेघे कुटुंबियांचा असा निर्णय घेण्यामागे नेमके काय कारण आहे? याचे उत्तर मिळालेले नाही. तर हा निर्णय घेणे ही मेघे कुटुंबिय आणि अदानी ग्रुप या दोघांचीही गरज होती. भविष्यातील काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय झाला असल्याची माहिती मिळत आहे.
2014 मध्ये सागर मेघे यांचा वर्धा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. त्यानंतर ते राजकारणापासून लांबच राहिले. शिवाय जिल्हा आणि महाराष्ट्रातील संस्थांमधील लक्ष कमी केले. त्यांनी दुबईमध्ये संस्थांचा मोठा विस्तार केला. मागील काही वर्षांपासून ते दुबईमधील संस्थांमध्ये रमले आहे. महिन्यातील 20 दिवस सागर मेघे आणि त्यांचे कुटुंबिय दुबईलाच असते. त्यामुळे त्यांनी अदानी फाऊंडेशनसोबत करार केल्याचे सांगितले जाते.
अदानी ग्रुपलाही विदर्भामध्ये एखाद्या हॉस्पिटलची गरज होती. पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली येथे स्टीलच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय चंद्रपूर, यवतमाळ इथेही कोळशाच्या खाणी आहेत. या खाणी घेण्यापूर्वी जवळच्या अंतरावर हॉस्पिटल असणे बंधणकारक असते. अदानी ग्रुप भविष्यात इथल्या खाणींच्या उद्योगाकडे वळू शकतो. त्यापूर्वी त्यांनी मेघेंचे हॉस्पिटल ताब्यात घेऊन एक अट पूर्ण केल्याचे सांगितले जाते.
दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था आणि अभिमत विद्यापीठाच्या अखत्यारित वैद्यकीय, आयुर्वेद, दंतसह इतरही बरेच वैद्यकीय महाविद्यालय आहे. 6 मे 2025 रोजी सावंगी मेघे येथील रुग्णालयाला प्रीती गौतम अदानी यांनी भेट दिली होती. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालादेखील अदानी फाऊंडेशनचे अध्यक्ष व अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तेव्हापासूनच अदानी समूहाचा इंटरेस्ट वाढत असल्याचे बोलले जात होते. दोन्ही संस्थांमध्ये समझोता झाल्यानंतर अदानी फाऊंडेशनच्यावतीने हा व्यावसायिक करार नसून सेवा आणि करुणेचे साधन असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.