MNS Jai Malokar  Sarkarnama
विदर्भ

MNS Jai Malokar Death News : अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू!

MNS Workers broke Amol Mitkaris car : जाणून घ्या, नेमकं काय घडलं आणि काय आहे पदाधिकाऱ्याची ओळख?

योगेश फरपट

MNS Vs Amol Mitkari News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर, संतप्त झालेल्या मनसैनिकांनी अकोला येथे मिटकरीची गाडी फोडून आपला राग व्यक्त केला. याप्रकरणी मनसेच्या एकूण 13 पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मात्र त्यापैकी एक असलेल्या जय मालोकार या मनसैनिकाचा रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जय मालोकार हा मनसेच्या(MNS) विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष होता.

अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांच्या गाडीची तोडफोड केल्यानंतर जय मालोकार याची तब्येत अचानक बिघडली होती. त्यामुळे त्याला तातडीने अकोला येथील केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र उपाचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. मनसे पदाधिकाऱ्याच्या मृत्यूची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली होती.

अकोल्यातील विश्रामगृहात अमोल मिटकरी थांबलेले असताना आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगड मारले व कुंड्या फेकल्या. त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मिटकरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हटल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर अकोल्यात मंगळवारी ही घटना घडली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT