Devendra Fadanvis and Sandip Joshi Sarkarnama
विदर्भ

Deputy Chief Minister : उपमुख्यमंत्र्यांचे देवगिरीतील कार्यालय सुरू, मानद सचिव संदीप जोशींनी सांभाळले काम !

Nagpur : विदर्भाच्या ११ जिल्ह्यातून लोक येथे येऊन आपले प्रश्‍न सोडवतात.

संजय डाफ

Devendra Fadanvis's Office will now be open full-time : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील देवगीरी या शासकीय निवासस्थानातील कार्यालय आता पूर्णवेळ सुरू राहणार आहे. विदर्भातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी मानद सचिव म्हणून नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भाच्या ११ जिल्ह्यातून लोक येथे येऊन आपले प्रश्‍न सोडवतात. (People from 11 districts of Vidarbha come here to solve their problems)

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्येक प्रश्‍नाकडे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळेच जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. आता पूर्णवेळ ते या कार्यालयात असणार आहेत. त्यामुळे विदर्भातील लोकांच्या समस्या वेगाने मार्गी लागणार आहे. फडणवीस यांच्यासोबत समन्वय ठेऊन संदीप जोशी विदर्भातील लोकांच्या प्रश्‍नांना न्याय देण्याचे काम करणार आहेत.

फडणवीस महाराष्ट्रभर (Maharashtra) फिरत असतात. संपूर्ण राज्याकडे त्यांचं लक्ष असतं, तसंच विदर्भाकडेही असतं. पण बरेचदा काही कामांचा पाठपुरावा करणे वेळेअभावी शक्य होत नाही. त्यामुळे विदर्भातील लोकांची निवेदने घेणे, त्यांची कामे मार्गी लावणे आणि पाठपुरावा करणे, यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे, असे संदीप जोशी यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

नागरिकांची निवेदने स्वीकारणे आणि संबंधित अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावून त्यांची कामे लवकरात लवकर कशी होतील, यासाठी या कार्यालयातून काम केले जाणार आहे. सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत लोकांच्या भेटी आणि दुपारी ३ ते ६ या वेळात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका लावण्याचे काम सध्या सुरू केले आहे. जे प्रश्‍न थेट उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित आहेत, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत, असे जोशी म्हणाले.

विदर्भातील लोकांचे प्रश्‍न नागपुरातील (Nagpur) कार्यालयातून सुटावे, अशी फडणवीसांची (Devendra Fadanvis) भूमिका आहे. या प्रक्रियेतून साध्या साध्या प्रश्‍नांचा निपटारा येथेच होईल. पण काही जटिल समस्या आहेत, त्या आमच्यापर्यंत येतील. त्यामुळे त्याचा निपटारा त्या-त्या स्तरावर आम्हाला करता येईल, असेही संदीप जोशी (Sandip Joshi) यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT