Devendra Fadanvis and Dr. Ashish Deshukh Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadanvis News : डॉ. आशिष देशमुख सामान्य माणूस नाही, तर मोठा कलाकार आहे !

Dr. Ashish Deshmukh : तडफदार आणि राजकारणाची समज असलेला नेता स्वगृही परत आला.

सरकारनामा ब्यूरो

Dr. Ashish Deshmukh's BJP entry ceremony News : आज खरोखर आनंदाचा दिवस आहे. डॉ. आशिष देशमुख यांच्यासारखा तरुण, तडफदार आणि राजकारणाची समज असलेला नेता स्वगृही परत आला, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. देशमुखांचे भाजपमध्ये स्वागत केले. (He knew the science of how to win elections)

नागपूरनजीकच्या कोराडी येथे आज (ता. १८) डॉ. आशिष देशमुख यांच्या भाजप प्रवेश सोहळ्यात फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, ज्यावेळी राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अवमान केला आणि न्यायालयातही माफी मागण्यासाठी नकार दिला. त्यावेळी त्यांनी निडरपणे आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. तेव्हाच आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मी ठरवलं की त्यांना भाजपमध्ये परत आणलं पाहिजे.

व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. आशिष देशमुख, अरविंद गजभिये, नागपूर शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके. राजीव पोतदार, आमदार टेकचंद सावरकर, अशोक मानकर, माजी आमदार सुधाकर कोहळे. मिलिंद माने, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, किशोर रेवतकर, चरण ठाकूर, संदीप सरोदे, रमेश मानकर आदी होते.

फडणवीस म्हणाले, डॉ. देशमुखांना स्वगृही आणण्याचं महत्वाचं कारण म्हणजे, ते मोठे कलाकार आहेत, ते सामान्य माणूस नाही. २००९साली सावनेरमध्ये त्यांनी निवडणूक लढली. भाजपने त्यावेळी प्रयत्नांची शर्थ केली. पण देशमुखांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केदारांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं.

त्यानंतर २०१४ला आम्ही आशिष देशमुखांना सांगितलं की, सावनेरमध्ये आमचा उमेदवार ठरलेला आहे. तुम्ही काटोलला जाऊन लढलं पाहिजे. अचानक दिलेला प्रस्ताव होता, पण त्यांनी तो स्वीकारला. जबरदस्त परिवर्तनाचा नारा देऊन ते गेले. भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत उभे राहिले. काकांची (अनिल देशमुख) रणनीती माहिती असल्याने ती भेदून विजय कसा मिळवता येईल, मोदींच्या नावाचा योग्य उपयोग करून निवडणूक कशी जिंकता येईल, याचं शास्त्र त्यांना माहिती होतं. त्यामुळे ते जिंकले.

थोड्या वेळापूर्वी बावनकुळे म्हणाले, ते खरं आहे. प्रत्येकाच्या जीवनात घेतलेले निर्णय कधी बरोबर ठरतात, तर कधी कधी चुकतात. एकदा जीवनाची दिशा योग्य प्रकारे ठरवावी लागते. त्यांच्यात नेतृत्व गुण आहेत, लोकांना जोडण्याची कला आहे. एक कमतरता होती ती, ती त्यांनी पूर्ण केली. शिर्डीला जाऊन साईबाबांचा आशीर्वाद घेतला आणि श्रद्धा व सबुरी घेऊन आले. आता त्यांची श्रद्धा भाजपवर तर सबुरी स्वतःकडे आहे. पुढे काय करायचं ते आम्ही ठरवू, असे फडणवीस म्हणाले.

सार्वजनिक जीवनात मी निवडणूक लढणार नाही, हे सांगायला मोठी हिंमत लागते. डॉ. पोतदारांनी ती हिंमत दाखवली होती. त्यानंतर तीच हिंमत आज आशिष देशमुखांनी दाखवली. सकाळी चंद्रशेखर बावनकुळे मी बसलो होतो, तेव्हा ते म्हणाले मला काम करायचे आहे. पक्ष सांगेल ते काम मी करीन. आज आम्हाला कुणालाही न सांगता. त्यांनी स्वतः जाहीर केले की, मी २०२४ची निवडणूक लढणार नाही.

श्रद्धा व सबुरी आणि भाजपची (BJP) नीती समजून ते परत आले आहेत. डाॅ. आशिष (Dr. Ashish Deshmukh) यांनी योग्य मार्ग पकडला आहे. आता चिता करण्याचं कारण नाही. याच पक्षात तुमचं पुढील जीवन असणार आहे. तुमची प्रगतीही याच पक्षात होणार आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT