Navneet Rana & Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis On Navneet Rana : भाजपचे देवेंद्र फडणवीस म्हणतात, नवनीत राणा या आधुनिक झाशीची राणी...

Amravati Mahayuti Prachar Sabha : 'मेळघाट असं मतदान करेल की, संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं रेकॉर्ड तुटेल. जो राम को लायेंगे, हम उनको लायेंगे असा आमचा नारा आहे, हम राम को लाये है, आता त्यांना आणायची जबाबदारी तुमची आहे', असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

Deepak Kulkarni

Amravati News : अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीसाठी भाजप आणि महायुतीनं आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पण ही लढत जिंकण्यात राणांना अपयश आले. या पराभवाच्या धक्क्यातून अद्यापही त्या सावरल्या नसल्याची त्यांनीच यापूर्वी सांगितलं आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवनीत राणा यांचा उल्लेख हा आधुनिक झाशीची राणी असा केला आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची अमरावती येथे सभा झाली. या सभेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. महाविकास आघाडी सरकार आल्यावर इथल्या कामावर रोख लागली. स्काय वॉकचं काम थांबवण्याचं पापही या आघाडीच्या सरकारच्या काळात झालं. कमिशनखोर आमदार असेल तर कसे चालेल? आम्ही पैसे देऊ तो खिशात टाकेल असा आरोपही त्यांनी विरोधकांवर केला.

आधुनिक झाशीची राणी...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा अमरावतीच्या सभेत उल्लेख आधुनिक झाशीची राणी म्हणून केला. ते म्हणाले, मेळघाटमध्ये नवनीत राणा यांना तुम्ही लोकसभेला लीड दिला. पण आपल्यासोबत बेईमानी झाली.पण आता जो राम को लाये हैं,उनको आपको लाना है. हमने हमारा काम किया हैं,अब आप की बारी हैं असंही त्यांनी म्हटलं. याचवेळी त्यांनी नवनीत राणा यांनी मेळघाटसंबंधी ज्या काही मागण्या केल्या आहेत, त्या आम्ही पूर्ण करु असा शब्दही त्यांनी दिला.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सभेत मेळघाटबाबतची कौटुंबिक आठवणही सांगितली. ते म्हणाले, माझ्या आजोबांचं घरही मेळघाटमध्येच होतं. राणा तिथली मुलगी तर मीसुध्दा इथलाच मुलगा आहे.मेळघाटची रबडी प्रसिद्ध असून ती खाण्यासाठी आम्ही यायचो,असा मजेशीर किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात मेळघाटवासियांसह माजी खासदार नवनीत राणा यांनाही मोठा शब्द दिला. ते म्हणाले, तुम्ही प्रपोजल करा.ती पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे. निवडणुकीआधी आणि नंतरही नवनीत राणांनी मेळघाटशी संपर्क ठेवला. मेळघाट हा त्यांचा परिवार आहे. मेळघाट असं मतदान करेल की, संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं रेकॉर्ड तुटेल. जो राम को लायेंगे, हम उनको लायेंगे असा आमचा नारा आहे, हम राम को लाये है, आता त्यांना आणायची जबाबदारी तुमची आहे, असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

दुधाला जास्त भाव मिळावा यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.हे सरकार तुमचं आहे. मुख्यमंत्री असताना मेळघाटात विकासकामं केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले,आदिवासी समाजासाठी बिरसा मुंडा योजना आणली.4000 कोटी रुपये दिले. आदिवासींच्या घरापर्यंत रस्ते जातील, वीज जाईल पाणी जाईल, घर बनतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासींसाठी 24000 करोड रुपये दिले,असा सगळा हिशोब मांडत फडणवीस यांनी राजकुमार पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सभेत मेळघाटबाबतची कौटुंबिक आठवणही सांगितली. ते म्हणाले, माझ्या आजोबांचं घरही मेळघाटमध्येच होतं. राणा तिथली मुलगी तर मीसुध्दा इथलाच मुलगा आहे.मेळघाटची रबडी प्रसिद्ध असून ती खाण्यासाठी आम्ही यायचो,असा मजेशीर किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT