Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis : वाचाळवीरांना सुबुद्धी यावी; देवेंद्र फडणवीसांच्या 'टार्गेट'वर कोण ?

Sanjay Raut : नवीन वर्षात लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करता याव्यात : फडणवीस

Sunil Balasaheb Dhumal

Nagpur Political News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज्यासह देशातील विविध मुद्द्यांवर राऊत भाजपचा कडक शब्दांत समाचार घेतात. त्यामुळे सत्ताधारी पक्षांकडून राऊतांवर सकाळचा भोंगा बंद करा, अशी टीका केली जाते. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नाव न घेता राऊतांवर नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच टीकेचा बाण सोडला आहे.

नागपूर विमानतळावर सोमवारी माध्यमांशी फडणवीसांनी संवाद साधला. ते म्हणाले, नवीन वर्ष सर्वांना सुखासमाधानाचे जावो, हीच अपेक्षा आहे. खरं म्हणजे जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत, त्याच आमच्याही असतात. त्यामुळे नवीन वर्षामध्ये लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करता याव्यात, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

यावेळी फडणवीसांनी नाव न घेता (Sanjay Raut) संजय राऊतांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, 'या नवीन वर्षाच्यानिमित्ताने जे वाचाळवीर आहेत त्यांनाही सुबुद्धी यावी, अशीदेखील ईश्वरचरणी प्रार्थना आहे‌.' यानंतर वाचाळवीर नेमके कोण, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर फडणवीसांनी उत्तर न देताच विमानतळ सोडले. यावर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भाजपचे आमदार नीतेश राणे ठाकरे गटाच्या राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देत असतात. ते राऊतांच्या टीकेला जशास तसे उत्तर देतात. राज्यातील राऊत आणि राणे यांची जुगलबंदी आता प्रसिद्ध झालेली आहे. आता (Devendra Fadnavis) फडणवीसांनी केलेल्या अप्रत्यक्ष टीकेला राऊत काय उत्तर देतात, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT