DCM Devendra Fadnavis  Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis Vs Congress: फडणवीसांच्या पराभवासाठी 'मविआ' मोठा डाव टाकणार; थेट 'लाडकी बहीण'च विरोधात उतरवणार?

Nagpur South West Assembly Constituency : महाविकास आघाडीकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मविआकडून रश्मी बर्वेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले तर फडणवीस विरुद्ध रश्मी बर्वे असा मुकाबला नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघांत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Deepak Kulkarni

Nagpur News : विदर्भातील जागांवरुन महाविकास आघाडीत घमासान सुरू आहे. याच जागांवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा आहे.पण आता याच विदर्भातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचा प्रमुख चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) विरोधात यंदा तगडं आव्हान उभं करण्यासाठी महाविकास आघाडी आता मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या फडणवीसांविरोधात काँग्रेस रश्मी बर्वे यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मविआकडून रश्मी बर्वेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले तर फडणवीस विरुद्ध रश्मी बर्वे (Rashmi Barve) असा मुकाबला नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघांत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. 1978 पासून या मतदारसंघात भाजपने आत्तापर्यंत तब्बल सातवेळा तर काँग्रेसनं दोनवेळा विजय मिळवला आहे. मात्र, यंदाची लढत भाजपसाठी सोपी असणार नसल्याचे दिसून येत आहे.

यंदा फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात महाविकास आघाडीने दंड थोपटले आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेही लढण्यास इच्छुक होते.

तसेच भाजपसह फडणवीसांचेही मित्र असलेले राज ठाकरे यांच्याही मनसेचे आव्हान असणार आहे. देवेंद्र फडणवीसांविरोधात मनसेकडून उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू आहे.त्यासाठी नावही निश्चित झाल्याचं बोलले जात आहे.

त्यात भर आता काँग्रेसच्या रश्मी बर्वे याही मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे.त्यामुळे एकीकडे भाजपची अन् महायुतीची धुरा सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मतदारसंघावर लक्ष द्यावे लागणार आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.आशिष देशमुख यांचा 49 हजार 344 मतांनी विजयी झाले होते.

जातवैधता प्रमाणपत्र वैध ठरवल्याचा उच्च न्यायालयाचा आदेश हाती पडताच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांनी थेट भाजप नेत्यांवर तोफ डागली.'देवाभाऊ कधीतरी देवासारखे वागा'असे सांगून त्यांनी लोकसभेप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव करू असा इशाराही दिला होता.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना जात प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे रश्मी बर्वे यांनी नागपूर खंडपीठात दाद मागितली होती. त्यावर उच्च न्यायालयानं त्यांना क्लीन चिट दिली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारची अनुमती याचिका फेटाळली असून नागपूर खंडपीठानं दिलेला निर्णय कायम ठेवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT