Balu Dhanorkar
Balu Dhanorkar Sarkarnama
विदर्भ

Dhanorkar : २०१४ पासूनच सुरू झाली महाभारताची पुनरावृत्ती, मनगटात ताकद संयम ठेवावा लागेल !

सरकारनामा ब्यूरो

Congress MP Balu Dhanorkar News : प्राचिन काळात महाभारत घडले. त्यात दुर्योधन आणि दुशासनाने कपटीपणाने शकुनीची मदत घेतली. लपंडाव करीत जुगाराचा डाव जिंकला होता. तेव्हा द्रोणाचार्य, भिष्म हे सारे हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत होते. आता देशात २०१४ पासून महाभारताची पुनरावृत्ती सुरू झाली आहे. देशाचा कारभार अराजकतेच्या दिशेने सुरू आहे आणि भारतीय संविधान संपविण्याचा कट रचला जात आहे, असे खासदार बाळू धानोरकर म्हणाले.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व राजुरा विधानसभा काँग्रेसच्यावतीने आयोजित नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या सत्कार समारंभात खासदार धानोरकर बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अभिजित वंजारी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, स्वागताध्यक्ष आमदार सुभाष धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, सुनील शेंडे, दौलतराव भोंगळे, ठाकरे, विजयराव बावणे, तुकाराम झाडे, दादाजी लांडे, शंतनू धोटे, गोंडपिपरीच्या नगराध्यक्ष सविता कुळमेथे, टेकाम, डाहुले, आनंद चलाख यांची उपस्थिती होती.

खासदार धानोरकर म्हणाले, केंद्रातील सरकार जनविरोधी आहे. त्यामुळे येत्या काळात या सरकारविरोधात रणांगणात उतरावे लागणार आहे. महाभारतात पांडवांचा विजय नेहमी होतो. त्यामुळे या कुरुक्षेत्रात विजयी होण्यासाठी शौर्य, मनगटात ताकद, संयम ठेवावे लागणार आहे. सोबतच श्रीकृष्णासारख्या सारथीचीही आवश्यकता असते. त्यानंतरच खऱ्या अर्थाने देशात सुराज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूतपणे उभा होत आहे. यापूर्वी केवळ एकच आमदार होता. त्यानंतर तीन आमदार, एक खासदार झाले. आता पाच आमदार, एक खासदार झाले आहेत.

२०२४ मध्ये चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वच निवडणुकांत काँग्रेसचा (Congress) विजय होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसची उत्तम संघटन बांधणी आहे. त्यामुळे हे यश संपादन करता आले. याची देशपातळीवरसुद्धा दखल घेण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने कधीही जाती-पातीचे राजकारण केलेले नाही. त्यामुळे समाजातील सर्व जाती-धर्माचे लोक काँग्रेस पक्षाच्या पाठिशी सदैव उभे राहिले आहेत. हे मागील लोकसभा आणि आताच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत दिसून आले असल्याचेही खासदार धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT