Shyam Manav, Mohan Mate and Dhirendra Maharaj
Shyam Manav, Mohan Mate and Dhirendra Maharaj Sarkarnama
विदर्भ

Dhirendra Maharaj : रिकामटेकडे नाहीत, श्‍याम मानवांनी रायपूरला जावे...

सरकारनामा ब्यूरो

Dhirendra Maharaj News : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्‍याम मानव यांनी धीरेंद्र महाराज यांना पुन्हा आव्हान दिले आहे. हा विषय आता चांगलाच वाढला आहे. यासंदर्भात धीरेंद्र महाराज यांच्या रामकथेचे आयोजक दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते (Mohan Mate) यांना आज विचारले असता, महाराज काही रिकामटेकडे नाही, असे ते म्हणाले.

४५० बेडचे हॉस्पिटल तयार व्हावे, यासाठी महाराज प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी ते देशभर रामकथा करतात, दिव्य दरबारही भरवतात. आम्ही जेव्हा नागपूरसाठी (Nagpur) त्यांच्याकडे वेळ मागायला गेलो, तेव्हा त्यांच्याकडे अजिबात वेळ नव्हता. पण त्यांनी आमच्या विनंतीवरून वेळ दिला. आता कोण ते श्‍याम मानव, त्यांना नागपुरात येण्याचे आव्हान देत आहेत.

क्षुल्लक गोष्टींसाठी पुन्हा पुन्हा येण्यासाठी धीरेंद्र महाराज काही रिकामटेकडे नाहीत, असा टोला त्यांनी श्‍याम मानव यांनी लगावला. नागपुरातील रामकथा ५ ते १३ जानेवारी आयोजित करण्याचे आमचे ठरले होते. पण ३ जानेवारीला त्यांचा फोन आला आणि यांपैकी दोन दिवस कमी करत आहो, असे त्यांनी सांगितले. दोन दिवस दिव्य दरबार घेऊ, असेही ते बोलले.

हे सर्व फेसबुकवर आहे. ठरल्यानुसार दोन दिवस दिव्य दरबार झाला आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. सात दिवस महाराज येथे होते, त्यांच्यात हिंमत होती, तर तेव्हाच त्यांनी येथे येऊन आव्हान करायला पाहिजे होते. पण तसे न करता त्यांनी संविधान चौकात विरोध केला आणि आयुक्तांना निवेदन दिले.

याम मानव यांना मी गेल्या ४० वर्षांपासून ओळखतो. वर्तमानपत्रांमधून अंनिसच्या कामाबद्दल वाचलेले आहे. आज स्थिती अशी आहे की, त्यांनी कुणी विचारत नाही. एखाद्या धर्मगुरूवर आरोप करून मोठे होण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. महाराज तर आता नागपुरात येणार नाहीत. मानवांनीच आता रायपूरला (Raypur) गेले पाहिजे. इतर धर्मांमध्येही अंधश्रद्धा पसरविला जात आहे, ते उघड करावे, असे आव्हान मी त्यांना कालच केले आहे. पण माझे आव्हान त्यांनी स्वीकारले नाही, असेही आमदार मते म्हणाले. त्यांना फक्त हिंदू धर्मगुरू दिसत आहे. त्यामुळे आता सर्व हिंदू संघटना त्यांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT