Akola
Akola  Sarkarnama
विदर्भ

मस्तवाल किरण बकालेला बडतर्फ करा, विनयभंगाचा गुन्हाही दाखल करा !

मनोज भिवगडे

अकोला : जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले या जातीयवादी अधिकाऱ्याला कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करून त्याचेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने आज अकोला (Akola) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून केली.

सेवा बजावत असताना मराठा समाजाबद्दल हीन दर्जाचे बेताल वक्तव्य या अधिकाऱ्याने केले. समाजातील महिलांची बेअब्रू होईल, या भूमिकेतूनच अश्लील असे वक्तव्य एका ऑडिओ क्लिपद्वारे करून त्याने समस्त मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण केला. ज्यामुळे समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. छत्रपती शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) या महाराष्ट्रात महिलांचा मानसन्मान करण्यात येतो, तसेच महाराष्ट्र (Maharashtra) पोलिस (Police) खात्यावर जनतेचा मोठा आदर व विश्वास आहे. असे असताना पोलिस दलातील शासन नोकर अशी जातीयवादी भूमिका घेतो ही गंभीर व धक्कादायक बाब आहे, असे आंदोलनकर्ते म्हणाले.

सेवा बजाविण्यापूर्वी दुर्जनाचे पारिमात्य, व सज्जनांचे संरक्षण करताना जातीच्या पलीकडे जाऊन सेवा बजावण्याची शपथ घेवूनही हेतुपुरस्सर मराठा समाजाविषयी द्वेषभावनेतून गरळ ओकून या पोलिस निरीक्षकांमुळे संपूर्ण पोलिस खाते बदनाम होणार आहे. तरी समस्त मराठा समाजाच्या झालेल्या अवमानाने संतापलेल्या मराठ्यांच्या तीव्र भावना संबंधित जिल्हा पोलिस प्रमुखांना कळवून त्या पोलिस निरीक्षकाला नुसते निलंबित न करता सेवेतून कायमचे कार्यमुक्त करावे व महिलांचा अपमान केल्याने त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघाला रस्त्यावर येऊन लढाई करावी लागेल, असा इशारा देत निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे व अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.

यावेळी मराठा महासंघाचे पदाधिकारी विनायकराव पवार, कृष्णा अंधारे, अविनाश नाकट, संजय सूर्यवंशी, विपुल माने, कल्पनाताई बिडवे, सिंधुताई पवार, प्रा. प्रदीप चोरे, पंकज जायले, सुनील जानोरकर, सुहास वक्ते, निखिल ठाकरे, घनश्याम दांदळे, राजेश देशमुख, नरेश सूर्यवंशी, प्रदीप लुगडे, प्रवीण शिंदे, राजेश पाटील, नितीन वाणी, दीपक गावंडे, श्रीकांत सरोदे, काशिनाथ पटेकर, वैशाली कदम, मनीषा शिंदे, राखी पटेकर, आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT