Yogendra Yadav on RSS Sarkarnama
विदर्भ

RSS : ‘भारत जोडो’मुळे डॉ. मोहन भागवत यांना मुस्लीम समाजासोबत बोलावे लागले !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना मुस्लिम समाजासोबत संवाद साधण्याची गरज भासली आहे.

Atul Mehere

नागपूर : ज्यावेळी आपल्या घराला आग लागली असेल, तेव्हा ज्याच्या हातात पाणी असेल, त्याच्याकडे धाव घ्यावी लागते. देशात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे आम्ही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला समर्थन दिल्याचे राजकीय विचारवंत व विश्लेषक स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव (Yogendra Yadav) म्हणाले.

आपल्या देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरण गढूळ झाले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो यात्रा काही दिवसांत महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होणार आहे. महाराष्ट्रात यात्रा दाखल होण्यापूर्वी वातावरण निर्मिती केली जात आहे. भारत जोडो यात्रेचे यश काय असेल, जर असे कुणी विचारत असेल, तर त्यांना सांगता येईल की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagawat) यांना मुस्लिम समाजासोबत संवाद साधण्याची गरज भासली आहे. त्यांना आता देशात गरिबी, बेरोजगारी, उपासमारी, आर्थिक विषमता दिसू लागली आहे, असे म्हणत योगेंद्र यादव यांनी आरएसएसवर प्रखर टीका केली.

भारत जोडो यात्रा २०२४ च्या निवडणुकीसाठी किती महत्वाची ठरेल हे मला माहीत नाही. मात्र देशात जे विष पसरविले जात आहे, त्यावर याचा परिणाम होईल. या यात्रेचा एक महिन्याचा अनुभव बघितला तर अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे आणि वेगवेगळे लोक यात जुळत आहे, असे मत योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलं. आज नागपुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत जोडो यात्रा आता १ हजार किलोमीटरचा टप्पा पार करत आहे. ही यात्रा देशात सुरू असलेल्या परिस्थितीच्या काळात देशाला जोडणारी ठरत आहे.

काँग्रेसने इतर संघटनांना यात्रेत जुळण्याचं आवाहन केलं होतं, त्या संदर्भात देशातील वेगवेगळ्या संघटनांची एक बैठक घेऊन यात्रेचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला. आम्ही काँग्रेस पक्षासोबत नाही, तर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जुळत आहो, असंही त्यांनी सांगितलं. आम्ही महाराष्ट्रात यात्रेसोबत जुळत आहो. केंद्र सरकारकडून संविधान संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात वेगळं वातावरण निर्माण केले जात आहे, त्या विरोधात आम्ही आहोत. या यात्रेतून हे दिसून आलं आणि फलित निघालं की आरएसएसला मुस्लिमांसोबत बोलावं लागलं. यात्रा कुठूनही जावो, मात्र त्याचा आवाज नागपुरात पोहोचला, हे मला ऐकायला येत आहे, असेही यादव म्हणाले.

ज्यांनी इतक्या वर्षांपासून आपल्या कार्यालयावर भारताचा झेंडा नाही लावला, त्या लोकांकडून देशात धार्मिक तेढ निर्माण केलं जातं आहे. यात्रेच्या मार्गासाठी खूप पर्याय सुचविण्यात आले होते. मात्र ही यात्रा कुठूनही गेली तरी ती देश जोडणारी आहे. त्यामुळे ती कुठून गेली, हे महत्त्वाचं नाही. विदर्भात किती समर्थन मिळेल हे आत्तापासून दिसत आहे. सगळे सोबत येत आहेत, असंही यादव म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT