Gram Panchayat Election Bhandara  Sarkarnama
विदर्भ

Gram Panchayat Election : भंडाऱ्याच्या कुंभलीत निवडणुकीदरम्यान दोन गटात तुफान राडा; वातावरण तापलं

Gram Panchayat Election : मतदान प्रक्रिया पार पडत असताना दोन गटात हाणामारी

सरकारनामा ब्यूरो

Gram Panchayat Election : राज्यातील तब्बल साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. आज सकाळीच मतदानला सुरवात झाली आहे. तर या पार्श्वभूमीवरच काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचं मुळ गाव असलेल्या सुकळीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुंभली या गावात दोन गटामध्ये तुफान राडा झाला असल्याचे समोर आले आहे.

कुंभली या गावात मतदान प्रक्रिया पार पडत असताना दोन गटात तुफान हाणामारी झाली. एका विशिष्ट गटाच्या उमेदवाराला मतदान केंद्र परीसराच्या आतमध्ये तर दुसऱ्या गटाच्या उमेदवाराला बाहेर ठेवल्यामुळे हा वाद झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील कुंभली येथे ही घटना घडली.

दरम्यान, यावेळी पोलीसांनी वेळीच मध्यस्ती केल्याने हा वाद लगेच मिटला. मात्र या झालेल्या हाणामारीच्या प्रकरणामुळे काही वेळ या ठिकाणी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. पण काही वेळानंतर हा तणाव निवाळला. तर या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे आता गुलाल कुणाचा? हे मतमोजणीच्या दिवशी समोर येणार आहे. (Gram Panchayat Election)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT