Krishna Khopde Sarkarnama
विदर्भ

BJP MLA Krishna Khopde : आधी भावनिक केलं नंतर गंडवलं; भाजप आमदार खोपडेंबाबत नेमकं काय घडलं?

Sunil Balasaheb Dhumal

Nagpur Crime News : सध्या लोकसभा निवडणुकीचा माहोल असल्याने कुठलाही नेते कुणालाही दुखवण्याच्या भानगडीत पडत नाहीत. निवडणुकीच्या या वातावरणात अनेक नेते मतदारसंघातील नाही तर अगदी जिल्ह्यातील कुणीही मदत मागितली लगेच करतात. मात्र याचा गैरफायदा घेणारेही आहेत. यातूनच नागपूरमधील भाजप आमदाराची फसवणूक झाली आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असला तरी यानिमित्त फसवणुकीचा अनोखा फंडा समोर आला आहे.

पूर्व नागपूर मतदारसंघाचे भाजप BJP आमदार कृष्णा खोपडे यांना एक फोन आला. मी तुमच्या भागात राहतो, अशी समोरुन ओळख सांगण्यात आली. तसेच अपघातात परिवारातील लोक मृत्युमुखी पडलेल्याचे सांगून खोपडे यांच्याकडे सहा हजारांची मागणी केली. खोपडेंनीही मदतीच्या भावनेने त्यांना लगेच मदत देऊ केली. नंतर मात्र आपली फसवणूक झाल्याचे त्यांना समजले.

याबाबत आमदार कृष्णा खोपडेंनी Krishna Khopde लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, खोपडेंना आलेल्या फोनवरील व्यक्तीने तो खोपडे राहत असलेल्या सुभाषनगर परिसरातील रहिवाशी असल्याचे सांगितले. आता ठाण्यात रस्त्यावरील अपघातात परिवारातील दोन सदस्य मृत्यू झाल्याचीही बतावणी केली. आता रुग्णवाहिकेच्या भाड्यासाठी सहा हजार रुपयांची गरज असल्याचेही त्या व्यक्तिने कळवले. त्या व्यक्तिची हालत ऐकून आमदार खोपडेंनी मदत म्हणून खात्यातून ऑनलाईन सहा हजार रुपये पाठवले.

या घटनेनंतर आमदार खोपडे नागपूरला Nagpur आले. नागपूरला परतल्यावर त्यांनी संबंधित परिवाराची विचारपूस करण्यासाठी माहिती घेतली. त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तपास केल्यानंतर आरोपी ठाण्यातील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे नावे प्रवीण कडू असून या गुन्ह्यात त्याला एका मित्राचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. आता पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT