Congress  Sarkarnama
विदर्भ

Nagpur Congress : काँग्रेसला पूर्व, पश्चिम, दक्षिणची चिंता

Nagpur Congress Vikas Thakre : लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमच शहर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. यात लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाचाही आढावा घेण्यात आला.

Rajesh Charpe

Nagpur News, 8 July : काँग्रेस पक्षाचा ग्राफ वाढला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे हेविवेट नेते नितीन गडकरी यांना विजयासाठी झुंजावे लागले. असे असले तरी लोकसभेच्या निवडणुकीत पूर्व, पश्चिम आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात अपेक्षित मतदान झाले नसल्याने काँग्रेस चिंतेत आहे.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमच शहर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. यात लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाचाही आढावा घेण्यात आला. शहर काँग्रेसचे अध्यक्ष तसेच लोकसभेचे उमेदवार विकास ठाकरे यांनी प्रचंड मुसंडी मारली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे मागील निवडणुकीतील विजयाचे मताधिक्य निम्म्यावर आणून ठेवले. पाच लाखांचे मताधिक्य गडकरी यांना अपेक्षित होते. प्रत्यक्षात दीड लाखांचीही लीड त्यांना घेता आली नाही.

मतदानाची टक्केवारी घसल्यानंतर भाजपची धाकधूक वाढली होती. ठाकरे यांनी काँग्रेसला विजयाच्या समीप आणले होते. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. असे असले तरी पूर्व, पश्चिम आणि दक्षिण नागपूरमध्ये काँग्रेसला कमी मतदान झाले.

पूर्व आणि दक्षिणमध्ये काँग्रेसचे (Congress) आमदार आहेत. दक्षिणमधून काँग्रेसला मोठी अपेक्षा होती. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे गिरीश पांडवा आणि आमदार मोहन मते यांच्यात कडवा मुकाबला झाला होता. अवघ्या साडेचार हजार मतांनी पांडव पराभूत झाले होते. तेव्हापासून ते सातत्याने मतदारसंघात सक्रिय आहेत. असे असतानाही मतदान कमी झाले.

दुसरीकडे पूर्व नागपूरकडून काँग्रेसला फार अपेक्षा नव्हती. या मतदारसंघाते गडकरी यांना सर्वाधिक 80 हजारांचे मताधिक्य दिले आहे. विशेष म्हणजे विकास ठाकरे हे स्वतः पश्चिम नागपूरचे आमदार आहेत. यामागच्या कारणांचा शोध घेण्याचे निर्देश या बैठकीत विकास ठाकरे यांनी दिले.

लवकरच विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. त्यासाठी बुथनिहाय व्युहरचना आखा. ज्यांना विधानसभा, महापालिकेची उमेदवारी पाहिले आहे त्यांनी प्रभाग, वार्डनिहाय नवीन मतदार नोंदविण्याचे कामे करावी.

जबाबदारीने मतदारांची व मतदानाची संख्या वाढवावी असे ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी विधानसभेसाठी काँग्रेसने इच्छुकांकडून 10 ऑगस्टपर्यंत अर्ज मागितले आहे. यासाठी खुल्या गटातून 20 हजार आणि राखीव मतदारसंघातील इच्छुकांकडून 10 हजार रुपयांचा पक्षनिधी घेण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT