Bhavana Gawali Latest News updates  sarkarnama
विदर्भ

शिवसेना खासदार भावना गवळी पुन्हा अडचणीत ; ईडीकडून समन्स, हजर राहण्याचा आदेश

चौकशीसाठी हजर न झाल्यास ईडी अजामिनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई :यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali)गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत.गवळी यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील (Mahila Utkarsh Pratishthan) मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भावना त्यांना ईडीकडून (ed) समन्स बजावण्यात आलं आहे.(Bhavana Gawali Latest News Updates)

पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश या समन्समधून देण्यात आला आहे. चौकशीसाठी हजर न झाल्यास ईडी अजामिनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. हरीश सारडा यांनी यांनी भावना गवळींची ईडीकडे तक्रार केली आहे.

सारडा यांनी केलेल्या तक्रारीनंतर भाजपचे नेके किरीट सोमय्या यांनी वाशीमला येऊन पत्रकार परिषद घेतली होती. त्यांच्याविरोधात 100 एकर जमीन असलेल्या बालाजी पार्टीकल बोर्डाच्या सहकारी कारखान्याबाबतच्या एकूण खरेदी-विक्री व्यवहाराबाबत तक्रार करण्यात आली होती.

सप्टेंबर महिन्यात 'ईडी'ने भावना गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. या प्रकरणात ईडीनं सईद खान या व्यक्तीला अटक केली होती. सईद खान हे खासदार गवळी यांच्या ट्रस्टमध्ये संचालक आहेत. या ट्रस्टला बेकायदेशीररित्या कंपनीमध्ये रुपांतरित करण्यासाठी सईद खान यांनी मध्यस्थी केली. त्यासाठीच धर्मदाय आयुक्त कार्यालयातही गैरयव्यवहार झाला.ह एकूण गैरव्यवहार १८ कोटींचा आहे. यात सात कोटी रुपयांच्या रोख रकमेचाही गैरवापर करण्यात आल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. त्यासंबंधी अधिक चौकशीसाठीच गवळी यांना तीनवेळा समन्स बजावण्यात आले होते.

ईडीच्या या कारवाईवर गवळी म्हणाल्या होत्या की,भाजपनं जुलमी सत्र सुरू केलं आहे. माझी आणि माझ्या संस्थांची काय चौकशी करायची ती करा. पण शिवसेना हा अन्यायाविरुद्ध लढणारा पक्ष आहे. आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही, माझी चौकशी करताय तर वाशिम जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांची पण चौकशी करा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT