Bhavana Gawali, Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Mahayuti Politics : पत्ता कट केल्यानंतर CM शिंदेंची भावना गवळींना मोठी गॅरंटी; म्हणाले, 'वाऱ्यावर सोडणार...'

Lok Sabha Election 2024 : शिंदेंना हिंगोलीत सीटिंग खासदार म्हणून हेमंत पाटलांना दिलेली उमेदवारी माघारी घ्यावी लागली, तर उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच यवतमाळ-वाशीममधून भावना गवळींचा पत्ता कट केला आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Yavatmal-Washim Political News : भाजपने सर्वेक्षणाचे कारण देत महायुतीतील शिवसेनेच्या नाशिक, हिंगोली, यवतमाळ-वाशीम Yavatmal येथील उमेदवार बदल्याची गळ घातली. मात्र, शेवटपर्यंत शिंदे गटाने प्रयत्न करूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अखेर भाजपपुढे नमते घ्यावे लागल्याचे दिसून येत आहे. शिंदेंना हिंगोलीत सीटिंग खासदार म्हणून हेमंत पाटलांना दिलेली उमेदवारी माघारी घ्यावी लागली, तर उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच यवतमाळ- वाशीममधून भावना गवळींचा Bhavna Gawali पत्ता कट केला आहे. मात्र, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी गॅरंटीही मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांची Hemnat Patil उमेदवारी रद्द केल्यानंतर त्यांच्या पत्नी राजश्री पाटलांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. राजश्री पाटलांना त्यांच्या माहेरकडून म्हणजेच यवतमाळमधून गवळी यांच्या जागी उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, आपल्या उमेदवारीवर टाच येऊ नये म्हणून भावना गवळी मुंबईत काही दिवस तळ ठोकून होत्या. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे गवळी या प्रचंड नाराज असल्याचे दिसून येत आहे. गवळींचा करेक्ट कार्यक्रम भाजपने केल्याचा आरोप त्यांचे समर्थक करत आहेत.

आता हेमंत पाटील यांच्या जागी आता हिंगोलीतून बाबूराव कदम कोहळीकर यांना संधी देण्यात आली आहे. यवतमाळ-वाशीमचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी (ता. 4) शेवटचा दिवस होता. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत राजश्री पाटील Rajashri Patil आणि कोहळीकरांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले. राजश्री पाटलांचा अर्ज भरताना भावना गवळी अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले आहे. यानंतर यवतमाळ येथे झालेल्या सभेत शिंदेंनी वाऱ्यावर सोडणार नसल्याचा शब्द गवळी आणि त्यांच्या समर्थकांना दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकनाथ शिंदे म्हणाले, भावना गवळी यांनी अनेक कामे मार्गी लावलेली आहेत. त्यांनी केलेल्या कामांचा राजश्री पाटलांना फायदा होईल. राजकारणात समीकरणे जुळवून आणण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. मात्र, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. एक भाऊ म्हणून भावना गवळींनाही शब्द देतो की, त्यांनाही योग्य मान सन्मान दिला जाईल. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून, दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे. त्या राजश्री पाटलांना नक्कीच मदत करतील, अशी अपेक्ष व्यक्त करत शिंदेंनी गवळी यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT