Sanjay Gaikwad Shiv Sena Sarkarnama
विदर्भ

Shivsena Vs BJP: एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा महायुतीचं राजकारण हादरवणारा दावा; म्हणाले,'भाजपचा हा नेता म्हणजे दुसरा खरातच,...''

Buldhana News: मुंबई-पुणे अशा प्रमुख शहरामधलं भाजप विरुद्ध शिवसेना वादाचं लोण विदर्भापर्यंत जाऊन पोहोचवलं आहे. बुलढाण्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील वादानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.

Deepak Kulkarni

Buldhana News: राज्यात एकीकडे नाशिकमधील वासनांध भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानं खळबळ उडवून दिली आहे. खरात प्रकरणात सुरू असलेल्या पोलिसांच्या तपासात रोज दिवसेंदिवस काही धक्कादायक खुलासे समोर येत आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदा'ऑपरेशन टायगर' चर्चेत आलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 पैकी तब्बल 8 खासदार फुटणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. पण आता अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अत्यंत जवळच्या आणि फायरब्रँड नेत्यानं भाजप नेत्याबाबत हादरवणारा दावा केला आहे.

मुंबई-पुणे अशा प्रमुख शहरामधलं भाजप विरुद्ध शिवसेना वादाचं लोण विदर्भापर्यंत जाऊन पोहोचवलं आहे. बुलढाण्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील वादानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.

शिवसेनेचे आक्रमक आणि वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांनी माजी आमदार अन् भाजप जिल्हाध्यक्षावर विजयराज शिंदेंवर धक्कादायक आरोप केल्यानं महायुतीतलं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

भाजप नेता विजयराज शिंदे हा दुसरा अशोक खरात असल्याचं वादग्रस्त विधान शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कला आहे. गायकवाड म्हणाले, विजयराज शिंदे याने त्याच्या शाळेत शिकत असणाऱ्या कितीतरी पोरी बरबाद केल्या आहेत, त्याने कितीतरी पोरींची इज्जत लुटल्याचा दावा केल्यानं राजकारण हादरलं आहे.

बुलढाण्याचे माजी आमदार व सध्याचे भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर आरोप केले. शिंदे यांनी त्यांच्याच निवासी शाळेतील अनेक विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले. शिंदे यांनी अनेक विद्यार्थिनींचे आयुष्य बरबाद केल्याचा आरोपामुळे संजय गायकवाड एका नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे.

तसेच विजयराज शिंदे यांच्या शाळेत शिकलेल्या अनेक माजी विद्यार्थिनींच्या जीवनात आता वाद होत आहेत, अनेक विद्यार्थिनी व पालकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत असल्याचं धक्कादायक विधानही गायकवाड यांनी म्हटलं आहे.मात्र, विजयराज शिंदेंनी गायकवाडांचे सर्वच्या सर्व आरोप फेटाळले आहेत.

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी भाजप नेते विजयराज शिंदे यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच शिंदे याने त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या आजी-माजी विद्यार्थिनींची व त्यांच्या पालकांची माफी मागावी. विजयराज शिंदे यांच्या शाळेत शिकलेल्या अनेक माजी विद्यार्थिनींच्या जीवनात आता वाद होत असून,अनेक कुटुंब तणावाचा सामना करावा लागत आहे.

चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असताना, भाजप आमदार श्वेता महाले यांनी गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गायकवाड हे माहिती अधिकाराचा धाक दाखवून आणि सरपंचांवर दबाव टाकून पक्षात प्रवेश करून घेत असल्याचा दावा महालेंनी केला होता. याला उत्तर देताना गायकवाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

जेलमध्ये टाकण्याची धमकी?

"कोणाला जेलमध्ये घालणार आणि कोणाला धमकावणार, हे आता आम्ही पण पाहणार आहोत. चिखलीच्या आमदार काय करतात, हे सर्व आमच्या कानावर आहे. मी काही घरात बसलेला आमदार नाही, संपूर्ण महाराष्ट्रात माझे नाव आहे," अशा शब्दांत गायकवाड यांनी थेट श्वेता महालेंना आव्हान दिले आहे.

महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि भाजप आमदार श्वेता महाले यांच्यातील शाब्दिक युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. "माहिती अधिकाराचा वापर करून दबाव टाकण्याचे 'हिजडे' धंदे मी करत नाही, ते कोण करतंय हे तुमच्या घरात चौकशी करा," अशा शब्दांत गायकवाड यांनी श्वेता महालेंवर घणाघाती टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT