Ambadas Danve demands Sanjay Gaikwad arrest : पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांच्या जो गुन्हा आहेत, तोच गुन्हा विधानसभा सदस्य एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांविरोधात आहे. संतोष पंडित यांना जशी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली होती.
त्याचपद्धतीने कारवाई आमदार गायकवाडांविरोधात झाली पाहिजे. अटक झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे.
शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे (Shivsena UBT) नेते अंबादास दानवे परभणी दौऱ्यावर होते. माध्यमांशी संवाद साधताना, त्यांनी आमदार गायकवाड यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर महायुती सरकारला घेरले. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांच्यावर झालेल्या कारवाईची आठवण करून, देत आमदार गायकवाडांविरोधात अटकेची कारवाई करणार का? असा प्रश्न केला.
अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, हा मुद्दा महिलेच्या सन्मानाचा आहे. महिला कोणीही असू, तिच्याविषयी बोलताना सन्मानाचीच भाषा वापरली पाहिजे. विधानसभा सदस्य आहे. त्याने जबाबदारीने वागले पाहिजे. जर विधानसभेचा सदस्य, महिलेविषयी अपशब्द वापरत असेल, कसे चालणार? राजकीय टीकाला त्याचपद्धतीने उत्तर द्या. पण संजय गायकवाड यांनी टीका करताना महिलेचा सन्मान पाळलेला नाही.
आता सरकारला म्हणणे आहे की, पुण्यात संतोष पंडित यांनी महिलेविषयी बोलण्यावरून, गुन्हा दाखल झाला होता. मध्यरात्री 12.38 मिनिटाने गुन्हा दाखल झाला होता. दीड वाजता त्यांना अटक केली होती. संजय गायकवाडांविरोधात देखील त्याचपद्धतीने गुन्हा दाखल आहे, त्यापद्धतीने अटक झाली पाहिजे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले.
संजय गायकवाड यांच्यापाठोपाठ त्यांचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडनमधील पुरस्कारावर देखील अंबादास दानवे यांनी निशाणा साधला. लंडनमध्ये पुरस्कार देणाऱ्या अनेक संस्था आहेत. आम्हालाही लोक आमंत्रण देतात. तिथे लंडनचे खासदार नव्हते, त्यांचेच बगलबच्चे बसलेले होते, असा टोला अंबादास दानवे यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.