Chandrashekhar Bawankule, Devendra Fadanvis and Eknath Shinde
Chandrashekhar Bawankule, Devendra Fadanvis and Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Bawankule : चंद्रकांत पाटलानंतर बावनकुळेंच्या मनातलं ओठावर आल्याने एकनाथ शिंदेंचे टेन्शन वाढले?

सरकारनामा ब्यूरो

Chandrashekhar Bawankule News : ''देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत'', असं मोठं विधान भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. बावनकुळे यांच्या मनातलं ओठावर आल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच टेन्शन वाढणार तर नाही ना? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

या आधी देखील चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पाटील म्हणाले होते की,''मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं''असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं विधान करत त्यांनी मनातलं बोलावून दाखवल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.

नागपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान उपस्थित लोकांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबोधित केले. यावेळी बावनकुळे म्हणाले,''ज्या-ज्या समाजावर अन्याय झाला तो-तो समाज त्यांच्याकडे गेला, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज आपली सर्वांची जबाबदारी आहे किमान मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत'', असं ते म्हणाले.

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, ''आपण सर्वांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्राचं भविष्य फक्त देवेंद्र फडणवीस हेच बदलू शकतात. कारण फडणवीस हे जाती-पातीच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काम करतात. त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी आहे २०१४ ते २०१९ चा काळ पुन्हा एकदा आपल्या राज्यात आला पाहिजे, असं मतही यावेळी त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, यावेळी बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस राज्याचे काय झाले पाहिजेत? असा प्रश्न देखील कार्यक्रमादरम्यान लोकांना विचारला. यावर लोकांनीही मुख्यमंत्री असं उत्तर दिलं. त्यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT