Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

Mungantiwar : गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढणार नाही, पट्टे देण्याबाबत विचार सुरू...

Atul Mehere

Encroachment on Gairan land : गायरान जमिनीवरील अतिक्रमण हे काल-परवाचे नाही, तर गेल्या ३० वर्षांपासूनचे आहे. त्यामुळे ते अतिक्रमण हटवू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना सांगितले. त्यानुसार अतिक्रमण हटवू नये, असा निर्णय सरकारने घेतला. येवढेच नव्हे तर अतिक्रमण हटवू नये आणि तेथील लोकांना गावठाणाप्रमाणे पट्टे देता येतील का, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

इस्लामपूर येथील लोकांशी काल मोबाईलवरून संवाद साधल्याचेही मंत्री मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यातील गडचांदूरसह राज्यातील अनेक गावांचा हा विषय आहे. सरकारच्या या निर्णयाने राज्यभरातील जवळपास सव्वादोन लाख लोकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती येथील महिलांनी ‘गायरान जमिनीवरील आमची घरे तोडू नये’, अशी मागणी मंत्री मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी पाठपुरावा करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय लावून धरला आणि हा निर्णय घेऊन गरिबांना दिलासा दिला.

सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रहाखातर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गायरान जमिनीवरील घरे अतिक्रमण म्हणून काढणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. इतकेच नव्हे तर सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका देखील दाखल करणार आहे. जिवतीच्या महिलांनी केलेली ही मागणी राज्यातील राज्‍यात २ लाख २२ हजार ३८२ व्‍यक्‍तींना दिलासा देणारी ठरली आहे. याच आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम असलेल्या जिवती, कोरपना तालुक्याच्या दौऱ्यावर सुधीर मुनगंटीवार होते. यावेळी त्यांनी दूरवरून आलेल्या महिलांच्या समस्या आणि अडचणी आस्थेनं समजून घेत त्या सोडवण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होती.

महिलांनी गावरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाकडून तगादा लावण्यात येत आहे आणि भविष्यात घरे आणि जागा नसल्याने जायचे कुठे, असा प्रश्न मांडला. तेव्हा मुनगंटीवार यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेत त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. ‘घाबरून जाऊ नका, तुमच्या जमिनी कोणीही हिरावून येणार नाही’, असा शब्द महिलांना दिला होता. आज जिवती, कोरपना येथील महिलांच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील गावरान जमिनीवरील हा प्रश्न एका झटक्यात मार्गी लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT