Chitra Wagh
Chitra Wagh Sarkarnama
विदर्भ

थोडी जरी लाज असेल, तर आशा सेविकांना ३५ रुपये देऊन टाका...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : कोरोनाच्या काळात आशा सेविकांनी आपला जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा सांभाळली. ग्रामीण भागातील आरोग्य जपण्याचे काम आशा सेविकांनी केले. त्यांना ३५ रुपये प्रतिदिवस मानधन वाढवून देण्याचे सरकारने म्हटले होते. कोरोनाची तिसरी लाटही ओसरली. पण सरकारने ते पैसे अद्याप दिले नाहीत. आता थोडी जरी लाज शिल्लक असेल, तर त्यांचे पैसे देऊन टाका, असे भाजप नेत्या चित्रा वाघ आज येथे पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

पत्रपरिषदेला भाजपचे (BJP) पॅनलीस्ट आणि प्रवक्ते धर्मपाल मेश्राम, (Dharmapal Meshram) चंदन गोस्वामी, महामंत्री संजय बंगाले आदी उपस्थित होते. मागे आरोग्य विभागाने सांगितले होते, की मुख्यमंत्र्यांशी (Chief Minister) बोलून लवकरच हा विषय मार्गी लावणार आहे. त्याचे पुढे काय झाले, हे अद्यापही कळले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी (Deputy Chief Minister) त्यांना ३५ रुपये प्रतिदिवस देण्याचे मान्य केले होते. पण अजूनही ते दिलेले नाही. केवळ आश्‍वासने दिली. ३५ रुपये रोज म्हणजे जवळपास १००० रुपये महिना त्यांना मिळणार आहे. पण या सरकारजवळ येवढाही पैसा नाही का? या महिलांनी उन्हातान्हात घरोघरी फिरून सेवा दिलेली आहे. मुख्यमंत्री तर पूर्ण वेळ घरातच बसून होते आणि घरात बसूनच त्यांनी ‘बेस्ट सीएम’चा पुरस्कार मिळवला. हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांना या महिलांसारख्या अनेक लोकांमुळे मिळाला आहे. येवढे जरी लक्षात घेतले तरी आशा सेविकांना पैसे दिले पाहिजे, असे त्यांना वाटेल, असे चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या.

विशेष अधिवेशनाची मागणी पुन्हा करणार...

महिला सक्षमीकरणाचे गोडवे गाता गाता आज दिवसभर राज्यातील सरकार थकणार नाही. पण त्यामागील काळी बाजू लक्षात घेतली पाहिजे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना अद्याप थांबलेल्या नाहीत. साकी नाक्याची घटना घडल्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवायची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. पण राज्यात फास्ट ट्रॅक कोर्ट आहेत का, हे त्यांनी सांगावे. त्यामुळे महिलांच्या प्रश्‍नावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी पुन्हा करणार असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.

संजय राऊतांनी दिलेल्या शिव्या, हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?

नागपूर ः गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यावरून कलम ३५४ चा गुन्हा दाखल होत नाही का, संजय राऊतांनी दिलेल्या शिव्या, हा महाराष्ट्राचा अपमान नाही का, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जिल्हाध्यक्ष अशोक गावडे माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल असभ्य शब्दांत बोलतो, हा विनयभंग नाही का, असे प्रश्‍न करीत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आज महाविकास आघाडीतील नेत्यांवर बरसल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT