Nagpur News, 31 Jan : मनसेच्या (MNS) पदाधिकारी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे महायुती आणि निवडणुकीच्या निकालावर चांगलेच बरसले. विधानसभेच्या निकालावर (Assembly Election Result) कोणाला विश्वास बसणार नाही असंही ते म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात कसे काय पराभूत झाले आणि राजू पाटलांना त्यांच्या गावातून एकही मत कसं मिळालं नाही असं म्हणत त्यांनी निकालावर शंका व्यक्त केली.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी जवळीक असल्याने भाजपच्या एकाही नेत्याने त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली नाही आणि मतही व्यक्त केलं नाही. मात्र गिरीश महाजन यांनी ठाकरे विनाकरण ईव्हीएमचा विषय काढत आहे आणि बोलायचे म्हणून बोलत आहेत, अशी टीका केली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.
गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, "ईव्हीएमचा प्रश्न निकाली निघाला आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना ईव्हीएममुळेच आपला पराभव झाल्याचे वाटत आहे. लोकसभेच्या वेळी ते ईव्हीएमबाबात काहीच बोलले नाहीत. विधानसभेच्या निकाल विरोधात जाताच त्यांना घोटाळा दिसू लागला आहे. पराभव झाला म्हणून विरोधात बोलायचे म्हणून ते बोलत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्याबाबत जे काही बोलायचे आहे ते बोलतील. मात्र, ईव्हीएमचा विषय निकाली निघाला आहे." तर विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा सर्वाधिक धक्का काँग्रेसला बसला आहे. पराभूत झालेल्या सुमारे शंभर उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. मतदारदिनाच्या दिवासापासून काँग्रेसने निवडणूक आयोग (Election Commission) ईव्हीएम आणि वाढीव मतांच्या विरोधात मोहीम उघडली आहे.
निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने दिलेली मतदारांची आकडेवारी आणि निकालानंतर सांगितलेल्या आकडेवारीत मोठा फरक आहे. 76 लाख अतिरिक्त मते कुठूण आली असा सवाल काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला केला आहे. उमेदवारांना सीसीटीव्हीचे फुटेज दिले जात नाही असाही आरोप केला आहे. निवडणूक आयुक्त भाजपला मदत करीत असल्याचाही काँग्रेसचा आरोप आहे. निवडणूक आयोगाची भूमिका संशायास्पद असल्याची भूमिका आता राज ठाकरे यांनीसुद्धा व्यक्त करत त्यांनी आपला रागही जाहीरपणे व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.