Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Fadanvis : आज फडणवीसही संतापले; म्हणाले, होऊन जाऊ द्या कारवाई...

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Legislative Council News : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी आज रद्द करण्यात आली. त्यानंतर देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. काल राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. हा मुद्दा आज विधानपरिषदेत चांगलाच तापला. (The country is looking at the traditions and customs of Maharashtra state)

राहुल गांधी प्रतिमेला ज्या पद्धतीने अपमानित करण्यात आले. दे दुःखद आहे. या परिसरात असं यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. महाराष्ट्र राज्याच्या परंपरा, प्रथा देश बघत असतो. ज्या पद्धतीने काल घडलं, ते योग्य नाही. विधानपरिषदेच्या सभागृहातील ज्यांनी कुणी हे केले, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. कुठल्याही नेत्याच्या बाबतीत हा प्रकार पुन्हा घडू नये, अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात करण्यात आली.

यासंदर्भात अंबादास दानवे म्हणाले, आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी परंपरेचा उल्लेख सभागृहात केला. परिसरात ती पाळली गेली पाहिजे. परिसरात राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारले गेले, हे चुकीचे आहे. उद्या आम्हीही असं आंदोलन करू शकतो. पण या परिसात जोडे मारो आंदोलन करणे योग्य नाही. ज्यांनी केले त्यांना समज दिली पाहिजे, कारवाई केली पाहिजे.

घटना घडल्यानंतर कालच मी खालच्या सभागृहात उभे राहून सांगितले की हे चुकीचे आहे. मी खात्री देतो की यानंतर सत्तारूढ पक्षाकडून असे कृत्य होणार नाही. पण गेले सहा महिने पायऱ्यांवर मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध खोके, मिंधे म्हणणे हे तुम्हाला मान्य आहे का. बाहेर आंदोलन केलेल्यांवर कारवाई करायची, मग येथे केलेल्यांवर का नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांविधानिक पदावर आहेत. राहुल गांधी सांविधानिक पदावर नाहीत. रोज त्यांना खोके, मिंधे म्हणणे चुकीचे आहे. दोन्हीकडे आचारसंहिता पाळली गेली पाहिजे. बाजूंचा दोन्ही विचार झाला पाहिजे. गेटच्या बाहेर काहीही करा, परिसरात असं करू नये. आमच्या सदस्यांना मी सांगितले, तुम्ही तुमच्या सदस्यांना सांगणार आहात का, असाही प्रश्‍न फडणवीसांनी केला.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तुमची मागणी असेल तर ती करू. पण मुख्यमंत्र्यांच्या (Chief Minister) विरोधात पायऱ्यांवर खोके आणि मिंधे म्हणत आंदोलन करणाऱ्यांवरही कारवाई करावी लागेल, असे म्हणत फडणवीसही (Devendra Fadanis) संतापले. करायची का कारवाई, असे त्यांनी विरोधकांना विचारले. दरम्यान सभापतींनी हस्तक्षेप करून हा विषय थांबवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT