Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

झोपडपट्टीधारकांसाठी फडणवीसांचा पुढाकार; प्रसंगी केंद्राशी चर्चा करणार

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील काही भागातील झोपडपट्टीधारकांना दिलेल्या नोटीसा तत्काळ मागे घेण्यात याव्यात, या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वात एका शिष्टमंडळाने आज रेल्वे (Indian Railway) अधिकाऱ्यांची नागपुरात भेट घेतली.

रामबाग, इंदिरानगर, जाटतरोडी, सरस्वतीनगर, तकिया परिसरातील 50 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नागपूर महापालिकेकडून मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले आहेत. ही जागा नासुप्रची असल्याने रेल्वेने दिलेल्या नोटीस मागे घेण्यात याव्या, अशी मागणी यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक खरे यांच्याकडे करण्यात आली. सुमारे 1600 कुटुंबांचा हा प्रश्न आहे. या परिसरात 100 वर्षांपूर्वी एम्प्रेस मिलकडे जाणारी रेल्वेलाईन टाकण्यात आली होती. गेल्या 75 वर्षांपासून त्या लाईनचा कोणताही उपयोग झाला नाही. नंतरच्या काळात नागपूर महापालिकेने त्यांना मालकी हक्काचे पट्टे दिले आणि ते महापालिकेला कर सुद्धा देत आहेत. वीज मंडळाने त्यांना वीज जोडणी सुद्धा दिलेली आहे. तीन पिढ्यांपासून ते तेथे राहत आहेत, असे या निवेदनात सांगण्यात आले आहे.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक तथा अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हणणे ऐकून घेत पट्टेवाटप झाले असेल तर आम्ही त्यांना विस्थापित करणार नाही, असे आश्वासन दिले, तसेच सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल, असेही सांगितले. यावेळी या भागातील नागरिकांशीही फडणवीसांनी संवाद साधला. गरज पडली तर याबाबत केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या स्तरावर या प्रश्नावर बैठक घेण्यात येईल, पण, कुठल्याही स्थितीत या नागरिकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन फडणवीसांनी यावेळी दिले. माजी महापौर संदीप जोशी आणि अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT