Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Fadanvis : फडणवीस कडाडले; म्हणाले, ..तर अशा अधिकाऱ्यांना घरी बसवावं लागेल !

Atul Mehere

नागपूर : आम्ही घेतलेल्या निर्णयांचे पालन होत नसेल तर अशा अधिकाऱ्यांना घरी बसवावे लागेल, असा गंभीर इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अधिकारी आणि काळाबाजार करणाऱ्यांना दिला आहे.

नागपूर (Nagpur) येथे विदर्भ (Vidarbha) इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या वतीने में MONCON या खाण विषयासंदर्भातल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. आमदार आशिष जयस्वाल यांनी रेतीचा विषय मांडला, त्याबाबत नवीन धोरण तयार करण्याचं काम करतोय. मी आशिष जयस्वाल (MLA Ashish Jaiswal) यांना विचारत होतो की तुम्हाला रेतीघाट देण्याचा निर्णय केला होता, त्याचं काय झालं? त्यावर ते म्हणाले दोन वर्षांपासून प्रयत्न करतोय. पण टीपी ट्रान्सपोर्ट परमिट मिळत नाही. ही आश्चर्याची बाब आहे, असे ते म्हणाले.

असे जेवढे अधिकारी आहेत, त्यांना घरी बसवावे लागेल. जो निर्णय आम्ही घेतला त्याचं पालन होत नसेल, तर आम्ही शांत बसणाऱ्यांपैकी नाही. आपण नाव द्या आम्ही सर्वांना घरी बसवू, असे फडणवीस म्हणाले. सरकार बदललंय, सर्वांना कळायला पाहिजे. हे सरकार पैसे खाणारे, धंदा करणारे सरकार नाही. जे काही लोकप्रिय नेते आणि मंत्री रेतीचा काळाबाजार करत होते, तसे आम्हाला चालणार नाही. आम्हाला त्यातून एक पैसा नको. सर्व पैसे सरकारच्या तिजोरीत जायला हवे, असेही फडणवीसांनी ठणकावून सांगितले.

जे कुणी असा व्यवहार करतील, अशा सर्वांना जेलमध्ये टाकणार, मी सोडणार नाही. कारण आमच्या पर्यावरणाला हानी करत आमच्या नदीला खोदून सरकारला एक पैसा दिला नाही. आतापर्यंत झालं ते झालं आता होऊ देणार नाही. यासंदर्भात पोलिस कारवाई पण करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT