अकोला : मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिलीच घोषणा केली, ती म्हणजे शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राची. याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असेही त्यांनी तेव्हाच सांगितले. आता राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. सरकारचा हा निर्णय अतिशय महत्वाचा असल्याचे अकोला ((Akola) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांचे कर्जबाजारी होणे म्हणजे बियाणे बसणे, त्यानंतर मग बियाणांचे व्याज, खत, फवारणी हा खर्चे होणे. परिणामी उत्पन्न कमी होणे. बाजारात किमतीही कमी जास्त होत राहतात. त्यानंतर आलेल्या उदासीनतेमध्ये आत्महत्या होतात. त्यामुळे कमी उत्पन्नात अधिक पीक घेण्याची किमया शेतकऱ्यांना साधावी लागणार आहे. कमी खर्चाच्या पिकाकडे शेतकरी वळल्यास शेतकरी आत्महत्या कमी होऊ शकतात, असे डॉ. भाले यांनी म्हटले आहे.
यापूर्वीही सरकारने आणि आम्हीसुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले. पण शेतकऱ्यांमध्ये ज्ञानाचा अभाव असल्यामुळे ते कापूस आणि सोयाबीनसारख्या खर्चीक पिकांकडे वळतात. तुलनेत ज्वारी, हरभरा या पिकांचा खर्च कमी आहे. त्याकडे शेतकऱ्यांना वळवण्यासाठी शासकीय पातळीवरही प्रयत्न झाले पाहिजेत. यासाठी विदर्भ, (Vidarbh) मराठवाडा, (Marathwada) राहुरी आणि कोकणात (Kokan) कृषी विद्यापीठं आहेत, त्यांची मदत घेऊन मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) घोषणा केलेला आत्महत्यामुक्त महाराष्ट्र घडवता येणे शक्य असल्याचेही विलास भाले म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथविधीनंतर पहिलीच घोषणा केली, ती म्हणजे 'शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र' करण्याची दरम्यान यावर अकोल्याच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विलास भाले यांना विचारले असता ते म्हणाले, आम्हाला सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर आम्ही या दिशेने काम सुरू करू. भाले यांनी, शेतकरी आत्महत्या रोखण्यापासून सरकारने काय करावे, याचा सल्लाही दिला आहे. नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जोरदार भाषण करत शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य करणार असल्याची घोषणा केली.
राज्यातील चार कृषी विद्यापीठांपैकी एक कृषी विद्यापीठ विदर्भात आहे. मात्र शेतकरी आत्महत्येच्या पिकाने तर विदर्भावरचं सारं आकाशच अंधारून गेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शेतकरी आत्महत्या मुक्त करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी केलेली घोषणा पूर्णत्वास जाण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भाले यांनी वाढत असलेला उत्पादन खर्च आणि उत्पन्न कमी यामुळे नैराश्यातून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे सांगितले आहे, तर सरकारने आत्महत्या रोखण्यासाठी शेतीवर आधारित उद्योग उभारणे गरजेचं असल्याचा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.