Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Farmers : शेतीपिकाचे नुकसान तर होतेच, पण जिवालाही धोका; शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे!

सरकारनामा ब्यूरो

Farmers suffered due to wildlife attacks : नागपूर जिल्ह्यातील नांदागोमुख परिसरातील शेतकरी वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे त्रस्त झाले आहे. शेतात शिरकाव करून वन्यप्राणी पिकाची हानी करतात. येवढेच नाही, तर रस्त्यावरून जाताना आमच्या जिवालाही रोही आणि डुकरांपासून धोका आहे, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

संबंधित विभागाकडे तक्रार करूनही ते लक्षतच देत नाही, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची पिके आणि जीव, दोघांचीही काळजी घेण्यासाठी उपाययोजना कराव्या, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. वनविभागाकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज करूनही त्याची दखल घेतली जात नाही.

जंगलालगत असलेल्या शेतीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक वर्ष शेतात राबल्यानंतर आता वन्यप्राण्यांचा त्रास वाढला आहे. शेतातील पिकावर वन्यप्राणी एकप्रकारे हल्ला करीत आहेत. पिकाची नासधूस होत नसल्याने शेती करावी किंवा नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. वनविभागाकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज केल्यानंतरही मिळत नाही. वारंवार असा प्रकार होत असल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट आले आले.

या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न वनविभागाने करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नागपूर जिल्ह्यातील नांदागोमुख व परिसरातील जोगा, जैतपूर, माळेगाव, सतरापूर, सावळी मोहतकर, खुरसापार इत्यादी गावात वन्यप्राण्यांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रोही व रानडुकरे हे प्राणी शेतातील पिके पूर्णतः फस्त करीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

नुकसानभरपाईसाठी अनेक शेतकऱ्यांनी वनविभागाकडे अर्ज केले. मात्र, त्यांनी केलेल्या अर्जावर अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नुकसानभरपाई मिळणार की नाही,असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. या परिसरातील जोगा व सावळी या गावाला लागून मोठे जंगल आहे. रात्रंदिवस रोही व रानडुकरांचा हैदोस सुरूच राहतो. बरेचदा रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना रोही टक्करसुद्धा देतात.

या मार्गावर नेहमीच अपघात (Accident) घडतात. तेव्हा वनविभागाने (Forest) लक्ष देऊन रानडुक्कर व रोही या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी असंख्य शेतकऱ्यांनी (Farmers) केलेली आहे. परिसरात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनीसुद्धा नुकसानभरपाईसाठी अर्ज करणे हे सुद्धा गरजेचे आहे. तेव्हाच पंचनामा करून नुकसानभरपाई मिळू शकते.

नितीन राठी, माजी उपाध्यक्ष,जिल्हा परिषद.

वन्य प्राण्यांनी नुकसान केलेल्या मालाची वनविभागाने पाहणी करावी. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून सर्वात जास्त तूर या पिकाची नासाडी झाली. त्यामुळे या भागात तुरीचे पीक पूर्णतः नष्ट झाले. त्याची शासनाने भरपाई द्यावी,

-गजाननराव सातपुते, शेतकरी संघटनेचे नेते.

नांदागोमुख व जोगा मार्गावर शेती आहे. परंतु यावर्षी रानडुकरे आणि रोही या जनावरांमुळे भाजीपाल्याचे पिकांचे, व तूर या पिकांचे मोठे नुकसान केले. त्या त्यामुळे समोर शेती कशी करावी, असा प्रश्न माझ्यासमोर आहे.

माणिकराव बल्की, माजी उपसरपंच, नांदागोमुख.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT