Bacchu Kadu
Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

अखेर काँग्रेस नेत्यांचा फोटो असलेले पालकमंत्र्याचे 'ते' बॅनर झळकले...

सरकारनामा ब्यूरो

अकोला : स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अकोला जिल्ह्यातील 75 हजार युवक युवतींचे रोजगार नोंदणी अभियान पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावतीने शहरासह जिल्ह्यात तसे बॅनर लावण्यात आले. पण या बॅनरवर कॉंग्रेसच्या (Congress) नेत्याचा फोटो नसल्यामुळे कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आणि बच्चू कडूंना कॉंग्रेसचे वावडे आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला. तर 'सरकारनामा'मध्येही याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. अखेर 'सरकारनामा'च्या बातमीची दखल घेत या बॅनरवर महसूल मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा फोटो असलेले नवीन बॅनर शहरासह जिल्ह्यात लावण्यात आले आहेत.

पालकमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतुन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून सुरू करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात 75 हजार बेरोजगार नोंदणी अभियान आयोजन केले आहे. याची जाहिरात म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. मात्र या बॅनरवर काँग्रेसच्या एकाही मंत्र्याचा अथवा नेत्याचा फोटो नसल्याने काँग्रेस पदाधिकारी नाराज झाल्याची भावना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले आणि बच्चू कडू यांच्याकडे व्यक्त केली होती. तर 'सरकारनामा'नेही पालकमंत्र्यांच्या या बॅनरचे वृत्त प्रकाशित केले होते.

अखेर या वृत्ताची दखल घेत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या तीनही पक्षाच्या मंत्र्यांच्या फोटोसह नवीन बॅनर नवीन ठिकाणी लावण्यात आले आहेत. तर जुने बॅनर अजूनही त्याच ठिकाणी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT