Winter Session : हिवाळी अधिवेशनाला उपराजधानी नागपूर येथे उद्यापासून (१९ नोव्हेंबर) प्रारंभ होत आहे. आजवरचे हिवाळी अधिवेशन नेहमीच नागपूरमध्ये झाली आहेत. मात्र याला महाविकास आघाडी सरकारमध्ये खंड पडला होता. नागपूरमध्ये मागील आणि शेवटचं हिवाळी अधिवेशन 2019 मध्ये पार पडले होते. यानंतर कोरोनाच्या संकटामुळे यात खंड पडला होता़, तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकले नव्हते.
उद्यापासून नागपूरमध्ये अधिवेशन होणार आहे. अधिवेशनापूर्वी सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. चहापानावर बहिष्काराच्या मुद्द्यावर विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले की, “या सरकारमध्ये कोणतेही समाधानकारक गोष्टी होताना दिसत नाही. यामुळे आम्ही आनंदाने सरकारने आयोजित केलेल्या चहापानासाठी जावे, अशी स्थिती नाहीच,” पवार यांनी नागपूरात पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी अजित पवार यांना एक प्रश्न विचारण्यात आला. 'शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहणार का?' या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर देताना पवार म्हणाले, “उद्धव ठाकरे या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीची संयुक्त बैठक उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नाना पटोले, आमचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे अंबादास दानवे, यांच्या उपस्थितीत सोमवारी होईल,” असे अजित पवार यांनी माहिती दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.