MUnicipal Corporation Election
MUnicipal Corporation Election Sarkarnama
विदर्भ

BJP : मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकांना लागले निवडणुकीचे वेध, म्हणतात हीच ती वेळ !

सरकारनामा ब्यूरो

Municipal Corporation Elections : आज होतील, उद्या होतील, असे म्हणता म्हणता महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत. प्रशासकांच्या भरवशावर कारभार चालत आहे. त्यामुळे माजी नगरसेवक अडगळीत टाकल्यासारखे झाले आहेत. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने महापालिका निवडणुकांसाठी ही योग्य वेळ आहे, असे भाजपच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे.

नागपूर (Nagpur) असो की मुंबई (Mumbai) राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने कामांचा धडाका सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नागपुरात ७५,००० कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. तिकडे मुंबईत महानगरपालिकेने (Municipal Corporation) रस्त्यांसह सुशोभीकरणाची कामे हाती घेतली आहेत. मुंबई मेट्रोचे कामही वेगाने सुरू आहे. त्यामुळे लोक समाधानी आहेत. मुंबईत सुशोभीकरणाच्या कामांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे या स्थितीत निवडणुका घेतल्यास भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर येईल, असा विश्‍वास मुंबईतील कुलाबा परिसराचे भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी व्यक्त केला.

समाजाच्या शेवटच्या घटकातील लोकांसाठी कामे सुरू आहेत. त्यामुळे लोक आनंदी आहेत. एकंदरीत भाजपच्या दृष्टिकोनातून चांगली स्थिती आहे. त्यातही आता एकनाथ शिंदे गट आणि भाजप सोबत मिळून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे. त्याचा फायदा होईल, हे नक्की. एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले शिवसैनिक ठरावीक विचारधारेवर अवलंबून आहेत, त्यामुळे ते इतरत्र जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे, त्यांचे शिवसैनिक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर अद्यापही नाराज आहेत. त्यामुळे शिंदे गटाला यावेळी चांगली संधी आहे.

मूळ शिवसेनेतले निष्ठावान कट्टर हिंदुत्ववादी जास्तीत जास्त संख्येने एकनाथ शिंदेंकडे आले आहेत. विचारधारेशी तडजोड करण्याची गरज नाही, असे त्यांना वाटते. जे निष्ठावंत नाहीत, आणि ज्यांची कामं सुरू आहेत, ते उद्धव ठाकरेंकडे आहेत. ते वेळेवर वेगळा निर्णयसुद्धा घेऊ शकतात. कट्टर हिंदुत्ववादी सैनिक शिंदे गटाकडे आल्यानंतर कॉंग्रेससोबत बसावे लागत नाही, म्हणून खूष आहेत. लोकांना विकास पाहिजे आहे आणि तो होतो आहे. कोस्टल रोड, मुंबई मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत. सुशोभीकरण डोळ्यांसमोर लोकांना दिसत आहे. कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे, त्याचा फायदा होतो आहे.

नागपूर असो की मुंबई, महापालिकांवर प्रशासक असल्यामुळे राजकीय प्रभाव चालत नाही. परिणामी निर्णय लवकर होतात. प्रशासक शिंदे फडणवीस सरकारचेच आहेत. त्यामुळे जी काम होत आहेत ती सरकारमार्फत होत आहे. त्यामुळे शिंदे-भाजप युतीला महापालिका निवडणुकीत हमखास यश मिळेल, अशी शक्यता जास्त आहे. अडीच वर्ष जी तडजोड करावी लागत होती, ती आता करावी लागत नाही. ज्या वेगाने निर्णय होतात, काम होतात, ते गेल्या १० वर्षात उद्धव ठाकरेंची सत्ता होती असताना झाली नाहीत. इन्कम्बंसी फॅक्टर काम करेल. भाजपकडून राज्याचा विकास झालेला लोकांनी बघितला आहे, तीच अपेक्षा महानगरपालिकांच्या बाबतीत जनतेला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपच्या युतीला जनता पसंती देईल आणि त्यासाठी हीच वेळ योग्य आहे, असेही मकरंद नार्वेकर यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT