Nitin Gadkari Sarkarnama
विदर्भ

Gadkari : नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा; म्हणाले निवडणुकीला सामोरे जाण्याआधी...

Nagpur : रोजगार मिळाला तरच गरिबी दूर होणार आणि प्रत्येकाची आर्थिक प्रगती होणार.

सरकारनामा ब्यूरो

Nitin Gadkari News : एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आगामी निवडणुकांचे वेध लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने तर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशातच नागपूरचे खासदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे.

फॉर्च्यून फाउंडेशनतर्फे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या समारोपीय सोहळ्यात गडकरी बोलत होते. ते म्हणाले, रोजगार मिळाला तरच गरिबी दूर होणार. प्रत्येकाची आर्थिक प्रगती होणार आणि ती झाली तरच विदर्भ आणि नागपूरचा विकास होणार आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी मिहानमध्ये एक लाख रोजगार देणार, असे आश्वासन त्यांनी दिले.

या कार्यक्रमाला लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, माजी आमदार नागो गाणार, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रभाकर हरडे, माजी नगरसेवक सुनील अग्रवाल, संदीप जाधव, सारस्वत बँकेचे सुप्रीत दीक्षित, सोनाली शेंडे, भारतीय स्टेट बँकेचे सहायक महाव्यवस्थापक पुरुषोत्तम बहिरशेठ उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, रोजगार हा फार महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी आपल्याला उद्योग आणावे लागतील, पर्यटन क्षेत्राचा विकास करावा लागेल. यातूनच आपण अधिक रोजगारनिर्मिती करू शकतो. मिहानमध्ये आतापर्यंत ८७ हजार रोजगार दिले आहेत. यात आणखी नवीन कंपन्या येऊ घातल्या असून भविष्यात रोजगार निर्मिती होणार आहे. नागपूर एमआयडीसीमध्येही ११ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. मी जे उपक्रम आणि उद्योग सुरू केले त्यात अडीच हजार कोटींची उलाढाल आहे. यातून पंधरा हजार लोकांना रोजगार दिला आहे.

आपण रोजगार देणारे व्हायला हवे. युवकांनी स्वतः मधील कौशल्य वापरून उद्योग जगतात पाऊल टाकावे. आपल्यातील उद्यमशीलतेचा विकास झाला तरच देश समृद्ध होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आत्मनिर्भर भारताचे (India) स्वप्न साकार होईल, असा विश्वास गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक माजी महापौर प्रा. अनिल सोले यांनी केले. संचालन योगेश बन, तर आभार गिरीश मुंदडा यांनी मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT