Nitin Gadkari Sarkarnama
विदर्भ

Gadkari : गडकरींविरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर, आरोपीवर गुन्हा दाखल !

Kasba : २८ वर्षानंतर कसबा मतदारसंघ हा भाजपच्या हातातून कॉंग्रेसने हिसकावून घेतला.

सरकारनामा ब्यूरो

In the name of Nitin Gadkari, an offensive text was posted : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेसचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांनी सोशल मिडियावर पोस्टचा पाऊस पाडला. या दरम्यान एकाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने आक्षेपार्ह मजकूर व्हॉट्स ॲप ग्रुपवर टाकला होता.

याप्रकरणी सायबर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना केले आहे. राज्यातील पुण्याच्या कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांचा निकाल गुरुवारी घोषित झाला. या निकालात २८ वर्षानंतर कसबा मतदारसंघ हा भाजपच्या हातातून कॉंग्रेसने हिसकावून घेतला. दरम्यान या निकालावरून सोशल मिडियावर संदेशाचा धुमाकूळ होता.

यांपैकीच एका संदेशात या निकालावरून एका व्यक्तीने नितीन गडकरी यांच्या नावाने आक्षेपार्ह वक्तव्य लिहून ते एका व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकला. हा संदेश व्हायरल झाल्यावर त्याची माहिती मिळताच, आज सकाळी गडकरी यांच्या खासगी सचिवांनी त्याबाबत सायबर पोलिसांकडे फोनवरून तक्रार नोंदविली. यावेळी त्यांनी पोलिस आयुक्तांनाही याबाबत माहिती दिली.

काल सायंकाळी खुद्द खासगी सचिवाने पोलिस आयुक्तालय गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. दरम्यान सायबर पोलिसांनी त्याचा शोध लावला असता, हा व्यक्ती यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्याचा रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्या शोधात पथक पाठविले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांनी दिली आहे.

यासंदर्भात नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या ऑफिसकडून ट्विट करण्यात आलं आहे. ‘पुण्यातील कसबा निवडणूक निकालाबाबत केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या नावाने व्हॉट्स ॲप ग्रुपवर खोटे आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये व्हायरल गेली जात आहेत. नागपूर (Nagpur) पोलिसांकडे याची तक्रार करण्यात आली असून गडकरींच्या नावाने अशा प्रकारे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती नागपूर पोलिसांना (Police) करण्यात आली आहे.’ असा ट्विटचा मजकूर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT