Nitin Gadkari  Sarkarnama
विदर्भ

Gadkari On Shiv Sena-BJP alliance : शिवसेना-भाजप युतीबद्दल गडकरी म्हणाले, जे जे होईल ते ते पाहवे!

Nagpur Politics : ‘सकाळ’च्या मनातले गडकरी कार्यक्रमात टाळले अधिक भाष्य.

Atul Mehere

Nagpur Nitin Gadkari Political News : राज्यात एकेकाळी चांगलीच गाजलेली भाजप-शिवसेना युती सत्तेच्या कारणावरून फाटली आहे. आता शिवसेनेतही फूट पडली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाची शिवसेना, अशा दोन शिवसेना राज्यात कार्यरत आहेत. त्यापैकी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेसह भाजप सध्या महाराष्ट्रात सत्तेत आहे. या दोन्ही शिवसेना आणि भाजपच्या युतीबद्दल फारसे वक्तव्य करणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाळले. (Gadkari avoids more comments in 'Sakal' program)

‘सकाळ माध्यम समूहाच्या'वतीने आज (ता. २१) नागपुरात मनातले गडकरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेता प्रशांत दामले यांनी या कार्यक्रमात गडकरी यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. त्यावेळी महाराष्ट्रातील युतीच्या मुद्द्यावर अधिक न बोलणे गडकरी यांनी पसंत केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपने एकमेकांपासून फारकत घेतली आहे. ठाकरे यांच्यापासून वेगळे होत एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार सध्या भाजपसोबत सत्तेत आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीबद्दल काय बोलणार, असा प्रश्न दामले यांनी केला.

दामले यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी यांनी अधिक न बोलणे पसंत केले. ‘तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पाहवे...’ असे नमूद करीत गडकरी यांनी भविष्यात दोन्ही शिवसेनेबाबत जे जे काय होईल, ते ते सर्वांना दिसेलच, असे स्पष्ट संकेत दिलेत. उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपपासून वेगळे होताना मुख्यमंत्रिपदाची अट ठेवली होती.

देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्रात लुडबूड न केल्यास व नितीन गडकरी नेतृत्व करीत असल्यास भाजपसोबत जाण्याची अप्रत्यक्ष तयारीही दर्शविली होती. तसेही देशातील सर्वपक्षीय नेत्यांना चालणारे नाव म्हणून नितीन गडकरी यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या मुद्द्यावर गडकरी काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त करतील, असे वाटत होते. मात्र, त्यांनी यासंदर्भात बोलण्याचा मोह आवरला.

शिवसेना आणि भाजप युतीबाबत कोणतेही भाष्य केले असते, तर देशाच्या व राज्याच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होईल, या वस्तुस्थितीची जाणीव असल्याने गडकरी यांनी या विषयावरील उत्तर एकाच वाक्यात संपविले. मात्र, मुलाखतीदरम्यान हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे आपल्यावर अतोनात प्रेम होते, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. त्यामुळे गडकरी या नावाला व्यक्तीश: कुणाचीही ‘ॲलर्जी’ नाही, असा अप्रत्यक्ष संकेतच त्यांनी  या वेळी दिला.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT